शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अपघातामध्ये आईचा मृत्यू, समर्थ झाला आईविना पोरका ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:03 IST

कोल्हापूर-रत्नागिरी राज्य महामार्गावर रेडेडोह येथे गुरुवारी झालेल्या व्हॅन अपघातामध्ये परभणी जिल्ह्यातील सुरेखा गोविंदराव सातपुते (वय २५, रा. असोला) यांचा मृत्यू झाला. त्यांचा पोटचा गोळा व आठ महिन्यांचा मुलगा समर्थ मात्र, आईविना पोरका झाला... त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याने मलमपट्टी करण्यात आली होती.

ठळक मुद्देअपघातामध्ये आईचा मृत्यू, समर्थ झाला आईविना पोरका ...!अपघात विभागातील परिचारिकांनीही त्याला दिली मायेची ऊब

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी राज्य महामार्गावर रेडेडोह येथे गुरुवारी झालेल्या व्हॅन अपघातामध्ये परभणी जिल्ह्यातील सुरेखा गोविंदराव सातपुते (वय २५, रा. असोला) यांचा मृत्यू झाला. त्यांचा पोटचा गोळा व आठ महिन्यांचा मुलगा समर्थ मात्र, आईविना पोरका झाला... त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याने मलमपट्टी करण्यात आली होती.परभणी जिल्ह्यातील तिडके, सातपुते, ढापसे या तिन्ही कुटुंबांतील, एकमेकांचे नातेवाईक असलेले गुरुवारी सकाळी जोतिबा देवदर्शनासाठी व्हॅनमधून निघाले होते. रेडेडोह येथे अपघातात सुरेखा सातपुते यांचा मृत्यू झाला; तर १३ जण जखमी झाले. ‘सीपीआर’मधील वेदगंगा इमारतीमधील महिला वॉर्डात अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात दोघेजण वाचले.

समर्थ सातपुते वेदगंगा इमारतीमध्ये गुरुवार सकाळपासून रडत होता. त्याचे नातेवाईक त्याला खांद्यावर घेऊन शांत करीत होते. समर्थचे रडू ऐकल्याने नातेवाइकांनाही काय करावे समजेना. त्याच्या आवाजामुळे ते दोन नातेवाईक स्तब्ध झाले. त्याला ते कसेबसे शांत करीत खेळवीत होते.

त्याचबरोबर अपघात विभागातील परिचारिकांनीही त्याला मायेची ऊब दिली व आपल्या खांद्यावर खेळविले. समर्थ शांत झाल्यावर त्याला त्यांनी नातेवाइकांकडे दिले. समर्थची आई अपघातात मृत झाल्याचे समजताच ‘सीपीआर’मध्ये हळहळ व्यक्त होत होती.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात