शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे, वाहतूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 16:49 IST

‘पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झाली पाहिजे’, ‘वाढीव टोल टॅक्स रद्द करा’, अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हलगी-घुमक्याच्या कडकडाट आणि बैलगाडीने ट्रक ओढून या मोर्चात इंधन दरवाढीचा निषेध आंदोलनकर्त्यांनी केला. कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात विविध १९ संघटनांचे पदाधिकारी, वाहतूकदार सहभागी झाले.

ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजेबैलगाडीने ट्रक ओढून निषेध

कोल्हापूर : ‘पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झाली पाहिजे’, ‘वाढीव टोल टॅक्स रद्द करा’, अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.

हलगी-घुमक्याच्या कडकडाट आणि बैलगाडीने ट्रक ओढून या मोर्चात इंधन दरवाढीचा निषेध आंदोलनकर्त्यांनी केला. कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात विविध १९ संघटनांचे पदाधिकारी, वाहतूकदार सहभागी झाले.

 कोल्हापुरात सोमवारी विविध मागण्यांसाठी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. (छाया : आदित्य वेल्हाळ)येथील ताराराणी चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. ‘वाहतूकदार एकजुटीचा विजय असो’, ‘हम सब एक हैं’, अशा घोषणा देत मोर्चा पुढे सरकत राहिला. मागण्यांचे फलक घेऊन आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मध्यवर्ती बसस्थानक, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, गोकुळ हॉटेल, उद्योग भवनमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. त्याठिकाणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावर रोखले तेथे आंदोलनकर्त्यांनी निषेध सभा घेतली.

त्यात कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चात भाऊ घोगळे, हेमंत डिसले, विजय भोसले, शिवाजी चौगुले, जगदीश सोमय्या, विलास पाटील, पंडित कोरगांवकर, विजय पोवार, शशांक जाधव, गोविंद पाटील, उमेश महाडिक, प्रकाश भोसले, बबन महाजन आदींसह पाचशे वाहतूकदार सहभागी झाले.

विविध मागण्या

  1. पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा
  2. थर्ड पार्टी प्रीमियम, टोलटॅक्समधील वाढ रद्द करा
  3. उत्पन्न गृहित धरून कर लावण्याचे विधेयक रद्द करावे
  4.  अर्थमुव्हींग वाहतूकदारांची आर्थिक पिळवणूक थांबवावी
  5.  कोल्हापुरात ट्रक, बस टर्मिनल उभारण्यात यावे
  6. गौणखनिज वाहतूक करणाऱ्या डंपरधारकांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी
  7.  वाळू उत्खननाचे ठेके पूर्ववत चालू करावेत
  8.  साखर कारखान्यातील हमालांकडून होणारी पिळवणूक थांबवावी 

मोर्चातील सहभागी संघटनाकोल्हापूर जिल्हा वाळू वाहतूक संघटना, बॉक्साईट ट्रक, आदर्श टेम्पो युनियन, आराम बस, लोकल माल ट्रक वाहतूक संघटना, घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट, हमाल व मजूर सोसायटी, गांधीनगर गुडस् ट्रान्सपोर्ट, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, शाहूवाडी तालुका मालट्रक वाहतूक संघ, नेर्ली, तामगांव, हलसवडे डंपर असोसिएशन, शिरोळ, निपाणी तालुका मोटार मालक संघटना, अर्थमुव्हर्स, कोल्हापूर गुडस् ट्रान्सपोर्ट, शिरोली नागांव ट्रान्सपोर्ट असोसिएशन.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPetrolपेट्रोल