शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गाय घेऊन जाणारा मिनी टेम्पो पकडला, तिघांवर गुन्हा : सीपीआर चौकात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 11:57 IST

बेकायदेशीररीत्या देशी गाय घेऊन जाणारा मिनी टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. ५) रात्री सीपीआर चौकात पकडला.

ठळक मुद्देगाय घेऊन जाणारा मिनी टेम्पो पकडला, तिघांवर गुन्हा : सीपीआर चौकात कारवाई

कोल्हापूर : बेकायदेशीररीत्या देशी गाय घेऊन जाणारा मिनी टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी  सीपीआर चौकात पकडला.

या प्रकरणी संशयित सचिन बाळासाहेब पोवार (रा. पंचगंगा तालीमजवळ, कोल्हापूर), इमरान बेपारी (रा. सदर बाजार, कोल्हापूर) व गौतम मधुकर कांबळे (रा. १६९, निंबाळकर माळ, सदर बाजार) यांच्यावर गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी ऊर्फ बंडोपंत माधवराव साळुंखे (रा. धोत्री गल्ली, गंगावेश, कोल्हापूर) यांनी दिली.पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री संभाजी साळुंखे हे सीपीआर चौकात मित्रांसमवेत थांबले होते. त्यावेळी संशयित टेम्पोचालक गौतम कांबळे हा टेम्पोतून गाय घेऊन जात होता. साळुंखे व त्यांचे मित्र शहरप्रमुख महेश उरसाल, सचिन मांगोरे, दिलीप भिवटे, संतोष निकम, आदींनी मिनी टेम्पोची तपासणी केली. त्यात देशी गाय आढळून आली.

या गाईबाबत टेम्पोचालका कांबळेला विचारले असता सचिन पोवार हा इमरान बेपारीला गाय विक्री करण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. हा प्रकार कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना कळविला. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले.

त्यांनी याप्रकरणी तिघांवर प्राणी संरक्षण व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेतलेली गाय ही संरक्षण व संगोपनासाठी खिल्लारे गो-शाळा, निमशिरगाव येथे पोहोचविण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक तिप्पे करीत आहेत. 

 

टॅग्स :cow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारkolhapurकोल्हापूर