शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मामाच्या गावाला शरद पवार ‘साहेबांच्या’ कार्यकर्त्यांची भेट, राष्ट्रवादीची कार्यकारिणी लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 11:53 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे या आजोळच्या गावाला भेट देणार असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी गावभेट देऊन आढावा बैठक घेतली. त्यामुळे पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कार्यकारिणी या भेटीसाठी कामाला लागली असल्याचे त्यांच्या धावपळीवरून जाणवत होते.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे आजोळ गोलीवडे (ता. पन्हाळा)नवीन वर्षात गोलीवडे गावाला भेट देण्यासाठी येणाऱ पवार ‘साहेब’जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी गावभेट देऊन घेतली आढावा बैठक

कोल्हापूर /पोर्ले तर्फ ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे या आजोळच्या गावाला भेट देणार असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी गावभेट देऊन आढावा बैठक घेतली. त्यामुळे पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कार्यकारिणी या भेटीसाठी कामाला लागली असल्याचे त्यांच्या धावपळीवरून जाणवत होते. शरद पवार नवीन वर्षात आपल्या आजोळच्या गावाला भेट देणार असल्याने ही पन्हाळावासीयांसाठी नवीन वर्षाची पर्वणीच ठरणार आहे.जिल्हा राष्ट्रवादी प्रमुख नेत्यांनी गोळीवडे गावातील मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी करून, भैरवनाथ मंदिरात कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी नेत्यांसह ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. के. पवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सरपंच नंदा चेचर, उपसरपंच अर्जुन वसेकर, ग्रामपंचायत सदस्य अलका शिंदे, सुनीता पाटील, कृष्णात जाधव, माजी सरपंच दगडू पाटील, अनिल पाटील, दगडू पाटील, संतोष धुमाळ, संजय पाटील, योगी प्रभूनाथ महाराज फौंडेशनचे कार्यकर्ते, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. रवींद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या कुशीत व विकासापासून थोडं दुर्लक्षित असणाऱ्या गोलीवडे गावात अचानक पांढऱ्या शुभ्र गाड्यांचा ताफा बघून ग्रामस्थ अवाक् झाले.

शरद पवार आपल्या आजोळी गावाला भेट देणार असल्याने राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते गावात कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी दाखल झाले होते. त्यामुळे ‘मोठे साहेब आपल्या गावाला भेट देणार!’ या गोलीवडेकरांच्या कल्पनेवर शिक्कामोर्तब झाल्याने ग्रामस्थांचे चेहरे फुलून गेले होते.गोलीवडे (ता. पन्हाळा) या आजोळी गावाला भेट देण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जय्यत तयारीसाठी बाबासाहेब पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पवार, अनिल पाटील व ग्रामस्थ गावभेटीला आले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर