शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मेडिकल असोसिएशनची ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 11:34 IST

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ हा अभिनव कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देमेडिकल असोसिएशनची ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ कार्यक्रमअशोक जाधव यांची माहिती : अल्प दरात विविध आजारांवर उपचार

कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ हा अभिनव कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी दिली.

शहर व ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे घेऊन त्यातील रुग्णांवर अल्पदरात शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिबिरांचे आयोजन सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

असोसिएशनच्यावतीने ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’या मोहिमेचा प्रारंभ एप्रिल २०१८ रोजी करण्यात आला. महिन्यातून कमीत कमी एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. कपिलेश्वर (ता. राधानगरी) व कसबा सांगाव (ता. कागल) येथे शिबिरे घेतली होती. शाहूवाडी तालुक्यात अकोले येथे पुढील शिबिर घेण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना योग्य व माफक दरात उपचार मिळावेत यासाठी ‘हेल्थ कार्ड’ ही संकल्पना असोसिएशनच्यावतीने राबवण्यात येणार आहे. कोल्हापुरात आम्ही पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवत असून महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनच्या पातळीवरही राबविण्यासाठी प्रयत्न राहतील, असे जाधव यांनी सांगितले.असोसिएशनच्या जनजागृती विभागातर्फे आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. १७) शाहू स्मारक भवन येथे सकाळी १० ते २ या वेळेत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत कोले व डॉ. अक्षय बाफना हे मार्गदर्शन करणार आहेत.

उपाध्यक्ष डॉ. संदीप साळोखे, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. शैलेश कोरे, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. पी. एम.चौगुले, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. आशा जाधव, डॉ. ए. बी.पाटील, डॉ. रमाकांत दगडे, डॉ. नवीन घोटणे उपस्थित होते.बोगस डॉक्टरांवर कारवाई आवश्यकचबोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत असोसिएशन पुढाकार घेण्यास तयार आहे; पण त्यांच्यावर प्रतिबंध करण्याचे अधिकार पोलीस, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, आरोग्य उपसंचालक कार्यालयास आहे. त्यांनी साथ दिली तर असोसिएशन निश्चितच पुढाकार घेईल, असे डॉ. अशोक जाधव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयkolhapurकोल्हापूर