शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बाजार समितीमध्ये गूळ परीक्षण प्रयोगशाळा व्हावी, हमीभाव उपसमितीच्या बैठकीतील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:22 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ परीक्षण प्रयोगशाळा होण्याबरोबरच लोकांमध्ये गूळ खाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा सूर गूळ हमीभाव उपसमितीच्या बैठकीत उमटला. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात ही उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. ए. एम. गुरव होते.

ठळक मुद्देबाजार समितीमध्ये गूळ परीक्षण प्रयोगशाळा व्हावीगूळ हमीभाव उपसमितीच्या बैठकीतील सूर गुळाच्या प्रश्नासंदर्भात ५ जुलैला सरकारकडे अहवाल होणार सादर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गूळ परीक्षण प्रयोगशाळा होण्याबरोबरच लोकांमध्ये गूळ खाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असा सूर गूळ हमीभाव उपसमितीच्या बैठकीत उमटला. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात ही उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. ए. एम. गुरव होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदम मुजावर, शाहू गूळ केंद्राचे राजाराम पाटील, गूळ संशोधक केंद्राचे डॉ. आर. आर. हसुरे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक अनिल पवार, डॉ. बी. जी. गायकवाड, गूळ व्यापारी नीकेत दोशी, अडत व्यापारी बाळासाहेब मनाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी कोल्हापुरात काही महिन्यांपूर्वी गुळाच्या प्रश्नांवर सविस्तर माहिती घेण्यासाठी गूळ हमीभाव उपसमिती स्थापन केली. त्यानुसार त्याची पहिली बैठक गुरुवारी झाली.बैठकीत गुळाचे उपपदार्थ कसे करता येतील? गुळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल? सेंद्रीय गूळ खाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी तो खाण्याची सवय लोकांमध्ये वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, गुळाचे ‘जीआय’ मानांकन तालुक्यासह गावागावातील शेतकऱ्यांकरीता कसे करता येईल, सेंद्रीय गुळाबरोबरच केमिकलमुक्त गूळ ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी त्याचे मोठ्या प्रमाणात तो तयार होण्याची गरज आहे, बाजार समितीमध्ये गूळ परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी, अशी मते समिती सदस्यांनी मांडली.

५ जुलैला शासनाला अहवाल होणार सादरयावेळी गुळासंदर्भातील प्रश्न, अडचणी व त्यावरील उपाय अशा १९ विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेतील सविस्तर तपशील विविध सूचना मांडण्यात आलेला अहवाल शासनाला ५ जुलैला पाठविण्यात येणार आहे. यावर शासनाचे ज्याप्रमाणे मार्गदर्शन होईल, त्यानुसार कार्यवाही होणार आहे, असे गुरव यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर