शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘त्या’ महिलेकडून अनेक डॉक्टरांची लुबाडणूक, गुन्हा दाखल होताच पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 13:30 IST

रुग्णालयात सोनोग्राफी करण्याचा बहाणा करीत शुक्रवार पेठेत राहणाऱ्या क्षीरसागर या महिलेसह टोळीने जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांकडून लाखो रुपयांची खंडणी गोळा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर-चंदगड ते मुंबई असा ह्या रॅकेटचा समावेश असून, ‘खून का बदला खून’ प्रकरणातून निर्दोष सुटलेला ‘डॉक्टर’ या रॅकेटचा म्होरक्या असल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्दे‘त्या’ महिलेकडून अनेक डॉक्टरांची लुबाडणूक, गुन्हा दाखल होताच पसारसराईत गुंड ‘डॉक्टर’ टोळीच्या नावाचा वापर

कोल्हापूर : रुग्णालयात सोनोग्राफी करण्याचा बहाणा करीत शुक्रवार पेठेत राहणाऱ्या क्षीरसागर या महिलेसह टोळीने जिल्ह्यातील अनेक डॉक्टरांकडून लाखो रुपयांची खंडणी गोळा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कोल्हापूर-चंदगड ते मुंबई असा ह्या रॅकेटचा समावेश असून, ‘खून का बदला खून’ प्रकरणातून निर्दोष सुटलेला ‘डॉक्टर’ या रॅकेटचा म्होरक्या असल्याचे पुढे आले आहे.

संशयित महिलेने डॉक्टरांना मोबाईलवरून दिलेल्या धमकीचे रेकॉर्ड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये ‘डॉक्टर’च्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. महिला पसार असून तिचे आणि डॉक्टरचे कॉल डिटेल्स पोलिसांनी मागविले आहेत. त्यामध्ये दोघांचे वारंवार संभाषण आढळून आल्यास डॉक्टरला गजाआड करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.डॉ. संतोष मुरलीधर वाघुले (वय ४६, रा. निंबाळकर कॉलनी, कावळा नाका) यांचे शाहूपुरी साईक्स एक्स्टेंशन येथे कोल्हापूर डायग्नोस्टिक सेंटर व राजारामपुरीत तिसऱ्या गल्लीत जानकी हॉस्पिटल आहे. त्यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित अविनाश आनंदराव सावंत याला अटक केली आहे.

संशयित क्षीरसागर या महिलेने डॉ. वाघुले यांना अनेक वेळा मोबाईलवरून खंडणीसाठी धमकी दिली आहे. त्यामध्ये मी गुंड ‘डॉक्टर’ गँगच्या जवळची असल्याचे रेकॉर्डिंग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा डॉक्टर ‘खून का बदला खून’ प्रकरणातून निर्दोष सुटला आहे. त्याचे मुंबईतील गँगवॉरशी जवळचे हितसंबंध आहेत.

कोल्हापुरातही त्याच्या आजूबाजूला गँगवार आहे. त्याच्या नावाचा या ‘क्षीरसागर’ महिलेने वापर केला आहे. त्यामध्ये खरेच डॉक्टरचा समावेश आहे काय? की त्याच्या नावाचा वापर केला आहे, याबाबत पोलीस कसोशीने शोध घेत आहेत. महिलेच्या कॉल लिस्टमध्ये डॉक्टराशी वारंवार बोलणे झाल्याचे आढळून आल्यास डॉक्टरलाही गजाआड करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच ती पसार झाली आहे. तिने अनेक डॉक्टर, व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल केल्याचे पुढे येत आहे. तिच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अनेक डॉक्टरांनी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे फोनवरून अभिनंदन केले. डॉक्टर व्यवसायामुळे व गुंडांच्या धमकीमुळे आम्ही भीतीपोटी पुढे येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. या टोळीने लाखो रुपये खंडणीतून मिळवल्याचेही सांगितले.पक्षातून हकालपट्टीसंशयित क्षीरसागर महिला राज्यातील एका आघाडीच्या सत्ताधारी पक्षामध्ये होती. तिने पक्षातील बड्या नेत्यांना अशाच प्रकारे ब्लॅकमेल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तिने गुन्हेगारी साम्राज्यातील डॉक्टरशी हातमिळवणी केली. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर