शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करा, संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 11:40 IST

राज्यातील असंघटित कामगारांकरिता स्थापन होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करण्याऐवजी स्वतंत्र मंडळच स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनकडून केली जात आहे.

ठळक मुद्देवृत्तपत्र विक्रेत्यांकरिता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करा वृत्तपत्र विक्रेता संघटनांची मागणी

कोल्हापूर : राज्यातील असंघटित कामगारांकरिता स्थापन होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करण्याऐवजी स्वतंत्र मंडळच स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनकडून केली जात आहे.याबाबत काल, मंगळवारी विधानसभेत आमदार सुनील प्रभू यांनी वृत्तपत्र विक्रेते पहाटेपासून मेहनत घेतात; पण त्यांच्या उपजीविकेचे काय, अशी लक्षवेधी मांडली. त्यात अन्य सदस्यांनीही सहभाग घेतला होता. त्यानुसार चर्चेला उत्तर देताना राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याऐवजी या वृत्तपत्र विक्रेत्यांचा महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे सांगितले. मात्र, वृत्तपत्र विक्रेत्यांना हा निर्णय मान्य नाही. 

सद्य:स्थितीत राज्यात दोन लाखांहून अधिक वृत्तपत्र विक्रेते कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची वेळही पहाटे अडीचपासून सुरू होते. दिवसभर ते कार्यरत असतात. इतर असंघटित कामगारांना वेळेची मर्यादा आहे. याशिवाय अपघात विमा, शैक्षणिक सवलत, निवृत्तीनंतर पेन्शन, आदी सोयी या सुरक्षा मंडळात आम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून न्याय द्यावा, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांकडून होत आहे.

अन्य कुठल्याही मंडळात आमचा समावेश न करता. आम्ही मागणी केलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करा. प्रिंट मीडियातील सर्व दुर्लक्षित घटकांचा त्यात समावेश आहे.- बालाजी पवार, सचिव,महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटना

 

वृत्तपत्र विक्रेत्यांची कामाची वेळ, पद्धत वेगळी आहे. पहाटे अडीचपासून यातील घटक दिवसभर कार्यरत असतात. इतर असंघटित कामगारांना वेळेची मर्यादा असते. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.- रघुनाथ कांबळे, सचिव,महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन

असंघटित कामगारांकरिता स्थापन केलेल्या राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात आमचा समावेश करणे म्हणजे आमच्या मागणीला पाने पुसण्यासारखे आहे.- किरण व्हनगुत्ते, अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनराज्य सामाजिक सुरक्षा मंडळात आमचा समावेश करुन सरकार आमच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळाला बगल देत आहे.- रवि लाड, अध्यक्ष,महानगर वृत्तपत्र विक्रेता संघ, कोल्हापूर 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरnewsबातम्या