शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे पाच कामगार दाम्पत्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 16:27 IST

एका अपत्यावर व दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्याबद्दल पाच सुखी कामगार दाम्पत्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

ठळक मुद्देमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे पाच कामगार दाम्पत्यांचा गौरवएका अपत्यांवर, दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर : एका अपत्यावर व दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्याबद्दल पाच सुखी कामगार दाम्पत्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राजारामपुरी ललित कला भवन येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे दि कमर्शियल बँकेचे संचालक अमरसिंह शेळके तर सरोज आयर्न इंडस्ट्रिज प्रशासन विभागाचे प्रमुख प्रकाश जाधव व अंनिसच्या कार्याध्यक्षा सीमा पाटील आदी उपस्थित होते.अमरसिंह शेळके म्हणाले, या दाम्पत्याने औद्योगिक कामगारांसमोर आदर्श ठेवला आहे. कुटुंबाचा आर्थिक समतोल हा कुटूंबातील सदस्यांच्या संख्येवरती अवलंबून आहे. छोटे कुटूंब आर्थिकदृष्टया सबळ असते,अशी अनेक उदाहरण पाहायला मिळतील.

याप्रसंगी मुदाळतिट्टा येथील गुंडाप्पा कांबळे, वीरशैव बॅकेचे मनोहर नकाते , एल्कॉम कंपनीचे संदीप तिरपणे, टेस्सीटयुरा माँटी कंपनीचे संदीप काशीद व वारणा दूध संघाचे नितीन पाटील यांचा सपत्नीक यांचा पाच हजार रुपयांचा धनादेश, शाल व श्रीफळ, गृहोपयोगी साहित्य, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संघसेन जगतकर यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी चंद्रकांत घारगे, राजेंद्र निकम, दीपक गावराखे, शाहिन चौगले, विद्या कांबळे , शोभा पोरे, स्वाती रणखांबे, सुचित्रा चव्हाण, स्वाती वायचळ, विजय खराडे, अशोक कौलगी, सुजाता बुधले, मंगल बेळगांवकर, श्वेतल सुतार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर