शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मातंग समाजावरील अत्याचाराच्या निषेधार्थ महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 17:25 IST

‘अ‍ॅट्रासिटी’चा कायदा कडक करावा, यासह मातंग समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ सकल मातंग समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे मातंग समाजावरील अत्याचाराच्या निषेधार्थ महामोर्चाभर पावसातही लक्षणीय सहभाग : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कोल्हापूर : ‘अ‍ॅट्रासिटी’चा कायदा कडक करावा, यासह मातंग समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ सकल मातंग समाजातर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळपासूनच मातंग समाजबांधव बिंदू चौकात जमायला सुरुवात झाली. या ठिकाणी महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मातंग समाजावर हल्ले व खून करणाऱ्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही, या हल्ल्याच्या सर्व घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत, अशा तीव्र भावना उपस्थित मान्यवर नेत्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.

यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. भर पावसातही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यासह राज्यातूनही समाजबांधव सहभागी होते. छत्रपती शिवाजी रोड, शिवाजी चौक, महापालिका, सी. पी. आर. चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘मातंग समाजाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘मातंग समाजावर हल्ले करणाºयांवर कडक कारवाई व्हावी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.यानंतर सकल मातंग समाजाचे निमंत्रक बाजीराव नाईक, शंकर तडाखे (पुणे), जगन्नाथ सकट (मुंबई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.भादोेले (ता. हातकणंगले) येथील मातंग समाजातील महिला रंगूबाई कुरणे या महिलेच्या खूनप्रकरणी केस जलदगती न्यायालयात चालविण्यात यावी. राज्यात मातंग समाजावरील अन्याय व अत्याचाराला रोखण्यासाठी सक्षम सरकारी वकिलाची नेमणूक करावी. राज्यातील मातंग समाजातील केसेस अ‍ॅड. हरीश साळवे यांच्याकडे द्याव्यात.

मातंग समाजाला संरक्षण द्यावे, अ‍ॅट्रासिटी कायदा कडक करावा, जामनेर (जि. जळगाव), रुद्रवाडी (ता. उदगीर, जि. लातूर), कोरेगाव-भीमा, औरंगाबाद, वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथे मातंग समाजावर घडलेल्या अत्याचारांच्या घटनांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात बबन सावंत, अ‍ॅड. दत्ता कवाळे, रूपा कवाळे, रूपा वायदंडे, रमेश चांदणे, भीमराव साठे, सुकुमार कांबळे, राम कांबळे, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Chakka jamचक्काजामkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी