शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

कोल्हापूर : महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट उभारणार धर्मशाळा, माफक दरात शंभर खोल्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 18:31 IST

कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोफत भोजनरूपी प्रसादाची सोय करणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या राहण्याची सोयसुद्धा माफक दरात व्हावी, या हेतूने १०० खोल्यांच्या तीन धर्मशाळा उभारण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देअत्याधुनिक सुविधा , माफक दरात शंभर खोल्यांची सोय, महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट उभारणार धर्मशाळा

कोल्हापूर : कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांची मोफत भोजनरूपी प्रसादाची सोय करणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या राहण्याची सोयसुद्धा माफक दरात व्हावी, या हेतूने १०० खोल्यांच्या तीन धर्मशाळा उभारण्याचा संकल्प केला आहे.

पहिल्या टप्प्यात २५ खोल्या येत्या मे महिन्यापर्यंत भाविकांच्या सेवेत दाखल होतील, तर ७५ खोल्यांचे बांधकाम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. ही केवळ धर्मशाळाच असणार नाही, तर भाविकांच्या दृष्टीने हे राहण्याची सर्वोत्तम, चांगल्या दर्जाची सुविधा देणारे केंद्र असेल, असा विश्वास ट्रस्टींनी व्यक्त केला आहे.याबाबत ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली. कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र चालविण्याचा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून अखंडपणे चालविला जात असून, उत्तम सेवा, गुणवत्ता यांच्या जोरावर ट्रस्टने भाविक वर्गात नावलौकिक प्राप्त केला आहे.

सध्या भाविकांच्या राहण्याची उत्कृष्ट सेवा महालक्ष्मी भक्त मंडळ देत आहे. तरीही जागेअभावी आणखी सोय करता येत नाही; म्हणूनच ही गरज लक्षात घेऊन महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे नवीन धर्मशाळा उभी करण्याचा संकल्प केला आहे. अंबाबाई मंदिराच्या काही अंतरावर असलेल्या राजोपाध्ये बोळातील पंतवाडा विकत घेऊन त्या ठिकाणी ही धर्मशाळा बांधण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यातील २५ खोल्या मे महिन्यापर्यंत, तर उर्वरित ७५ खोल्यांचे बांधकाम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा निश्चय असून, धर्मशाळेत रेस्टॉरंट, पार्किंगसह राहण्याची उत्तम सोय केली जाईल. प्रत्येक खोलीत टी.व्ही., गरम पाण्याची सोय, वाय-फाय सुविधा, अंतर्गत सजावट चांगली असेल. एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांचा खर्च त्यासाठी अपेक्षित असला तरी तो देणगी आणि कर्ज यांच्या माध्यमातून उभा केला जाईल.

विशेष म्हणजे या प्रकल्पास काही बॅँकांही कर्ज देण्याकरिता पुढे आलेल्या आहेत. भविष्यात एक हजार खोल्यांची धर्मशाळा उभारण्याचे ट्रस्टचे उद्दिष्ट असले तरी पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने हे कार्य पूर्ण केले जाईल. आजकाल भाविक मोठ्या संख्येने कोल्हापुरात येतात; परंतु त्यांना राहण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने ते आल्यादिवशीच देवीचे दर्शन घेऊन परत जातात.

भाविक कोल्हापुरात मुक्काम करायला लागले की येथील व्यवसायांत मोठी वाढ होणार आहे. त्यामुळेच आम्ही धर्मशाळा उभारण्याच्या प्रयत्नात आहोत, असे राजू मेवेकरी यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संजय जोशी, कार्यवाह सुनील खडके, खजानिस प्रशांत तहसीलदार, राजेश सुगंधी, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmbadevi Mandirअंबादेवी संस्थान