शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : यंत्रणा सक्षम, अधिकारी मात्र अकार्यक्षम जयंती नाल्याचे दुखणे : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:50 IST

आवश्यक मशिनरी म्हणाल, तर जागेवर आहे. मनुष्यबळ म्हणाल, तर आवश्यकतेएवढे आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला, तर जनरेटरचीदेखील सोय आहे. फक्त जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या कष्टाळू अधिकाºयांची वानवा आणि जबाबदार वरिष्ठ अधिकाºयांचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष या कारणांनी जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे प्रमाण वाढले

ठळक मुद्देजयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे रोजचंच दुखणंकारणे दाखवा’ नोटीस बजावल्या, आयुक्त व महापौरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश

भारत चव्हाण /

कोल्हापूर : आवश्यक मशिनरी म्हणाल, तर जागेवर आहे. मनुष्यबळ म्हणाल, तर आवश्यकतेएवढे आहे. विद्युत पुरवठा खंडित झाला, तर जनरेटरचीदेखील सोय आहे. फक्त जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या कष्टाळू अधिकाºयांची वानवा आणि जबाबदार वरिष्ठ अधिकाºयांचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष या कारणांनी जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे प्रमाण वाढले आहे. तुम्ही कितीही पंचनामे करा, कारणे दाखवा नोटीस द्या, वीज कनेक्शन तोडा, आम्ही आमच्या पद्धतीनेच काम करणार या अधिकाºयांच्या मानसिकतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून, ही बाब अतिशय गंभीर आहे.

जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळण्याचे रोजचंच दुखणं झाल्यामुळे अधिकाºयांच्या संवेदनाही बोथट झाल्या आहेत; पण याच बोथट संवेदना नदीच्या खालच्या बाजूकडील नागरिकांच्या जीवावर उठायला लागल्या आहेत, तरीही त्याचे काहीच वाटत नाही, हे मात्र भयंकर आहे. गेल्या सात- आठ वर्षांत असंख्यवेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावल्या, आयुक्त व महापौरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश झाले, वीज कनेक्शन तोडले, न्यायालयाने फटकारले, राष्ट्रीय हरित लवादाने फैलावर घेत प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करण्याचे बंधन घातले, अधिकाºयांना दंड करण्यात आला. तरीही महानगरपालिकेचा कारभार सुधारत नाही म्हटल्यावर आता काय करायला पाहिजे हाच प्रश्न आहे.

जरा पाऊस पडला, वीज पुरवठा बंद झाला, की जयंती नाल्याचे सांडपाणी वाहू लागते. रोजचेच दुखणं असल्याने अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी अशा सांडपाण्यात लक्ष घालत नाहीत; त्यामुळे जयंती नाला वाहतच आहे.शहरातील जवळपास ६० एम. एल. डी. सांडपाणी उपसा करण्याची क्षमता असलेले ४५० एच. पी. क्षमतेचे पाच उपसा पंप बसविले आहेत. जनरेटर बसविला आहे; पण या यंत्रांचा पुरेपूर वापर करण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. एकाही अधिकाºयाने यात लक्ष घालून हा प्रश्न कसा सोडविला पाहिजे, याचा अभ्यास केलेला नाही. हा केवळ निष्काळजीपणाच म्हणायला पाहिजे.- जयंती नाल्यावरून रोज ६० एम. एल. डी. सांडपाण्याचा उपसा- ४५० एच. पी. चे दोन उपसा पंप कायम सुरू, ४५० एच. पी.चे ३ पंप स्टॅँन्डबाय म्हणून राखीव.- सांडपाणी वाहून नेण्यासाठी दसरा चौक ते प्रक्रिया केंद्रापर्यंत १००० एम. एम. जाडीची जलवाहिनी.- लाईट गेल्यास जनरेटरची सोय; पण या जनरेटरचा वापर होत नाही.

अधिकाºयांचा हलगर्जीपणा नडतोयशहरातील सांडपाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या दृष्टीने जीवनमरणाचा प्रश्न आहे. ड्रेनेज विभागाचा कारभार एका चतुर्थश्रेणी कर्मचाºयाकडे सोपविण्यात आलेला असून, त्याची जबाबदारी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आली आहे. कुलकर्णी यांच्यावर पाणी पुरवठ्याची मुख्य जबाबदारी आहे; त्यामुळे ते पूर्णवेळ सांडपाणी प्रक्रियांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. ‘आग लागली की बंब जसे धावतात’ तसे हे कुलकर्णी काही प्रश्न निर्माण झाला की जयंती नाल्यावर धावतात, अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. जनरेटर खरेदी केला असला, तरी त्याला अद्याप कनेक्शन दिले गेले नाही, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे.आता काय करायला पाहिजे ?१. जयंती नाला बंधारा येथून सांडपाणी प्रक्रि या केंद्राकडे सांडपाणी वाहून नेण्याकरिता १००० एम. एम. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. जलवाहिनी टाकली त्यावेळचे सांडपाणी आणि आताचे सांडपाणी याचे प्रमाण वाढलेले आहे. महापालिकेकडे पाच उपसा पंप आहेत, त्यातील दोन २४ तास सुरू असतात. तीन स्टॅँडबाय म्हणून राखीव ठेवले जातात. जेव्हा पहाटे ५ ते दुपारी २ पर्यंत सांडपाण्याचा प्रवाह वाढतो, तेव्हा स्टॅँडबायपैकी आणखी एक - दोन पंप सुरू करावे म्हटले, तर जलवाहिनीची तितकी क्षमता नाही; त्यामुळे स्टॅँडबाय सुरू करता येत नाहीत. ही अडचण आणि पुढील काही वर्षांचा विचार करता आणखी एक जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता आहे.२. जयंती नाल्यावर जो बंधारा बांधण्यात आला आहे, त्याची उंची खूपच कमी आहे. त्यामध्ये पाणी अडविण्याची क्षमता कमी झाली आहे. बंधाºयाची उंची आणखी काही मीटरनी वाढवून सांडपाणी अडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. याशिवाय बंधाºयालगत जयंती नाल्याच्या पात्रातील साचलेला गाळ काढला गेला पाहिजे. तसेच नाल्याच्या पात्राची खोली वाढविली पाहिजे, ज्यामुळे सांडपाणी नदीत वाहण्याचे थांबेल.

३. जितका स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याचा विषय महत्त्वाचा आहे, तितकाच सांडपाणी निर्गतीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे; त्यामुळे या कामावर एक जबाबदार अधिकाºयाची नेमणूक तातडीने केली पाहिजे. त्यांच्याकडे अन्य कोणताही अतिरिक्त कार्यभार देता कामा नये.दोन दिवस नाला वाहतोय थेट नदीतजयंती नाला गेले दोन दिवस थेट नदीत मिसळत आहे. मंगळवारी दुपारी अचानक केबल शॉर्टसर्किटमुळे जळाली. ती बदलण्यासाठी दोन तासांहून अधिककाळ उपसा यंत्रणा बंद ठेवावी लागली. बुधवारी सकाळीदेखील हा नाला नदीत वाहत होता. ड्यूटीवरील कर्मचाºयांनी ब्लीचिंगचा डोस वाढवला; पण हा काही कायमस्वरूपी उपाय नव्हे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर