शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : लांडोरीच्या दोन पिल्लांना जीवदान, शेतकर्‍याची मुक्या प्राण्यांबाबत कृतज्ञता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:17 IST

लांडोर या मादी जातीच्या पक्षाचा घातपात झाल्याने, मायेच्या उबेसाठी वनवासी झालेल्या दोन पिल्लांना जीवदान देऊन त्यांना पन्हाळा वनविभागाच्या ताब्यात दिले.

ठळक मुद्देलांडोरीच्या दोन पिल्लांना जीवदानपन्हाळा वनविभागाच्या दिले ताब्यात

पोर्ले तर्फ ठाणे : लांडोर या मादी जातीच्या पक्षाचा घातपात झाल्याने, मायेच्या उबेसाठी वनवासी झालेल्या दोन पिल्लांना जीवदान देऊन त्यांना पन्हाळा वनविभागाच्या ताब्यात दिले.

गेले चार दिवस मायेच्या उबेसाठी चिवचिव करणाऱ्या चार पिल्लांपैकी दोन पिल्ली वन्यप्राण्यांची शिकार झाली. उर्वरित दोन पिल्लांच्या वाट्याला जीवघेण संकट येऊ नये म्हणून निकमवाडीच्या शेतकर्‍याने त्या पिल्लांना पकडून जीवदान दिले. त्यांनी मुक्या प्राण्यांबाबत कृतज्ञता दाखविल्यामुळे निसर्गमित्रांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.अधिक माहिती अशी, पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील शेतकरी गोरख निकम ओढा नावाच्या शेतात वैरण कापण्यासाठी जात होते. चार दिवसांपासून त्यांच्या आजूबाजूला लांडोर जातीची चार पिल्लं चिवचिव करीत घुटमळ असत; परंतु शुक्रवारी सकाळी चार पिल्लांपैकी दोनच पिल्लांचा चिवचिवाटासह नजरेस आलीत. गोरखने आजूबाजूला त्यांच्या आईची शोधाशोध केली; पण त्यांची आई आणि ती पिल्लं आढळून आली नाही.श्रावण मास समाप्तीनंतर एखाद्या शिकाºयाचा ती लांडोर निशाणा झाली असल्याची शक्यता निसर्गमित्राकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संरक्षक कवच हरपल्याने चार पिल्लांपैकी दोन पिल्लं वन्यप्राण्यांची शिकार झाली. मायेच्या उबेसाठी पोरकी होऊन चिवचिवणाºया पिल्लांची गोरखला दया आली. त्यांनी त्यांना पकडून सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाचे कर्मचारी यशवंत पाटील, तानाजी लव्हटे यांच्याकडे दिली.शिकारीचं गांभीर्य वनविभागाला आहे?पन्हाळा तालुक्याला सह्याद्रीच्या रांगेतील डोंगराळ भाग असल्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा आढळ जादा प्रमाणात आहे. डोंगराळ भागातील बेसुमार वृक्षतोड झाल्याने वन्यप्राण्यांना गाववेशीवरच्या किंवा शेतवडीतील झाडांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे काही हौशी शिकार्‍याना वन्यप्राण्यांची शिकार करणे सोपे होत आहे. वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी पन्हाळा वनविभाग काही गांभीर्याची पावले उचलणार का? 

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यkolhapurकोल्हापूर