शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सर्किट बेेंच ठरावाचे पत्र मूख्य न्यायमूर्तींना देणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 18:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी स्वत: मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आग्रही आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच द्या, या मागणीचे पत्र नवीन रुजू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी शेंडा पार्क येथे इमारत उभारण्यासाठी लागणारे ११ कोटींच्या निधीची तरतूद मुख्य न्यायमूर्तींनी निर्णय देताच लगेच करु, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देसर्किट बेेंच ठरावाचे पत्र मूख्य न्यायमूर्तींना देणारपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही ज्येष्ठ विधीतज्ज्ञ डी. बी. भोसले यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी स्वत: मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आग्रही आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच द्या, या मागणीचे पत्र नवीन रुजू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी शेंडा पार्क येथे इमारत उभारण्यासाठी लागणारे ११ कोटींच्या निधीची तरतूद मुख्य न्यायमूर्तींनी निर्णय देताच लगेच करु, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.न्याय संकुल इमारतीच्या शाहु सभागृहात ज्येष्ठ विधीतज्ज्ञ अ‍ॅड. डी. बी. भोसले यांनी लिहलेल्या ‘अधिकार अभिलेखाबाबतचा कायदा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख व सत्र न्यायाधीश एम. ए. लवेकर होते.

मंत्री पाटील पुढे म्हणाले, अ‍ॅड. भोसले यांनी न्यायव्यवस्था सुकर होणारे पुस्तक लिहले आहे. त्याचा फायदा शासन, न्याय व्यवस्था, वकील आणि नागरिकांना होणार आहे. महसुल कायदा हा ब्रिटीशन कालिन कायदा आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल झाले नाही, मात्र खूप कमी बदल झाले. ई-सातबाराची कल्पना रेंगाळलेली होती. गेल्या दोन वर्षात ३७ हजार गावांचे ई-सातबारा पूर्ण झाला आहे. सहा हजार गावे प्रलिंबित आहेत. ती एप्रिल अखेर पूर्ण करुन दि. १ मे ला ३५६ तालुक्यांपैकी ३०० तालुक्यामध्ये ई-सातबाऱ्याचे काम पूर्ण होवून तो आॅनलाईन दिला जाणार आहे.

ब्रिटीशांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार कायदा तयार केला. स्वातंत्र्य मिळालेनंतर तो आपल्या आवश्यक्तेनुसार केला पाहिजे. त्यासाठी महसूल कायदा बदलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून नुकत्याच झालेल्या अधिवेशनात चार कायदे बदलण्यात आले आहेत. अ‍ॅड. भोसले यांनी लिहलेले पुस्तकही महसूल कायदा निट करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावत आलो आहे. अंबाबाईचा कायदा केला. मंदिरासाठी ७८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. भाविकांची गैरसोय होवू नये, यासाठी भव्य आणि सर्वसोयीनियुक्त असा दर्शन मंडप उभा केला जाणार आहे. कोल्हापूरचा टोल कायमचा बंद करुन त्याचे ४५९ कोटी रुपये देणे आहे. ३१ मार्चच्या आधी १०० कोटी सरकारने दिले.

वकील आणि पक्षकारांच्या जिव्हाळ्याचा प्रलंबित असलेला सर्किट बेंच चा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मूख न्यायाधिश रुजू होताच त्यांना राज्य सरकारच्या वतीने कोल्हापूरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी पत्र देणार आहोत. त्यासाठी मुखमंत्री फडणवीस आग्रही आहेत. हा प्रश्न लवकरच संपूण जाईल अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश लवेकर यांनी अ‍ॅड. भोसले यांनी ‘अधिकार अभिलेखाबाबतचा कायदा’ हा गुंतागुंतीचा विषय आपल्या सर्वांसाठी पुस्तकरुपाने सोपा करुन सांगितला आहे. त्यांनी मांडलेले काही बदल, सुचना यावर येत्या काही कालावधीमध्ये विचार होवू शकतो. सर्वांना उपयोगी पडणारे उत्तम पुस्तक आहे. स्वागत अ‍ॅड. किरण पाटील तर आभार अ‍ॅड. नारायण भांदीगरे यांनी मानले. सूत्रसंचलन अ‍ॅड. असावरी कुलकर्णी यांनी केले. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे, शिवाजीराव राणे, डी. बी. घाटगे, यांचेसह वकील उपस्थित होते.आखाडी जमिनी परत करणारआखाडी पड प्रकार काय आहे, हे जाणून घेतले असता त्या काळात सारा भरला नाही, त्या शेतकऱ्याच्या जमिनी सरकारने जप्त केल्या आहेत. मात्र राज्य सरकारने आकार भरणाऱ्यांना आखाडपड जमिनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना महसुल कायद्यासंबधी जाणवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.ग्रामीण भागातील व्यक्तिला प्रॉपर्डी कार्ड मिळणारग्रामीण भागामध्ये प्रॉपर्टी कार्ड नाही. त्याचे प्रात्यक्षिक घेतले तर यासाठी दहावर्ष लागतील अशी चर्चा झाली. जमावबंदी आयुक्त चोखलिंगम यांचेशी बैठक घेवून दीड वर्षामध्ये प्रत्येक ग्रामीण माणसाला प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नकाशा, मोजणी आता डिजीलाईन आॅनलाईन मिळणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील