शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची विधानपरिषद बिनविरोध होणार ? फडणवीस, पाटील दिल्लीला गेल्याने चर्चेला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 11:21 IST

दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ‘बरा’ प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही त्यांनी सांगितले होते.

कोल्हापूर : भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दोघेही दिल्लीला गेल्याने राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे. असा निर्णय जरी झाला तर मग कोल्हापूरची जागाही बिनविरोध होणार का, अशी विचारणा करण्यात येत आहे.दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ‘बरा’ प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही त्यांनी सांगितले होते.

काल, गुरुवारी झालेल्या हालचालींमध्ये मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. तेथे एक जागा शिवसेनेकडे आणि एक जागा भाजपकडे आहे. याच पद्धतीने उर्वरित जागा बिनविरोध करण्यासाठी आता प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. नागपूर आणि धुळे या दोन जागा भाजप एकतर्फी जिंकणार असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. म्हणूनच काँग्रेस आणि भाजपने केवळ लढाई करण्यापेक्षा निवडणूक बिनविरोध करण्यास प्राधान्य दिल्याची चर्चा आहे.कोल्हापूरचे काय ?कोल्हापुरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पाहता भाजपने निर्णय घेतल्यास महाडिक काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. जर दिल्लीत निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला तर हीच लढाई पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे आता शुक्रवारी माघारीच्या दुपारी तीनपर्यंत साऱ्यांचे लक्ष दिल्ली, मुंबईतील निरोपाकडे राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलAmit Shahअमित शाह