शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तीन दिवसांत उचलला साडेसहाशे टन कचरा, महापालिका कर्मचाऱ्यांचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 18:04 IST

दिवाळीच्या तीन दिवसांत तब्बल साडेसहाशे टन कचरा या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवून दिली. अद्यापही काही भागात कचरा साचला असून, पुढील दोन दिवसांत तो उचलला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्दे तीन दिवसांत उचलला साडेसहाशे टन कचरामहापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान

कोल्हापूर : संपूर्ण शहरवासीय दिवाळीची मौजमजा लुटत असताना आणि कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी सुट्यांचा आनंद लुटत असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील १९०० सफाई कामगार मात्र घरची दिवाळी बाजूला ठेऊन शहर स्वच्छ ठेवण्याच्या कामात व्यस्त राहिले.

दिवाळीच्या तीन दिवसांत तब्बल साडेसहाशे टन कचरा या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवून दिली. अद्यापही काही भागात कचरा साचला असून, पुढील दोन दिवसांत तो उचलला जाणार असल्याचे सांगण्यात आले.वर्षातील सर्वांत मोठा सण म्हणजे दिवाळी होय. या सणाच्या निमित्ताने बाजार पेठेत करोडो रुपयांची खरेदी होते. कपडे, फराळ, फटाके, प्रापंचिक वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू याभोवती गुंडाळलेले कागद, प्लास्टिक पिशव्या,फोमिंग प्रत्येक घराघरांत येत असते.

दिवाळी सणाच्या निमित्ताने झालेल्या खरेदीमुळे कचरा निर्माण होण्याचे प्रमाण २0 ते ३0 टनाने वाढते. त्यातील वस्तू, कपडे वापरल्यानंतर त्यापासून निर्माण होणारा कचरा रस्त्यावर येतो. नागरिक हा सर्व कचरा शहरातील कोंडाळ्यात किंवा घंटा गाडीकडे देतात; त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्याच्या व्यवस्थेवर ताण पडतो.एकीकडे संपूर्ण शहर दिवाळीच्या आनंदात न्हाऊन गेले असताना आणि कार्यालयातील इतर कर्मचारी सुट्यांची मौजमजा लुटत असताना महापालिकेतील आरोग्य विभागातील सफाई कामगार मात्र सकाळी सहाच्या ठेक्यावर येऊन शहर स्वच्छ ठेवण्याच्या कामात व्यस्त होते.

दिवाळीत कचऱ्याचे प्रमाण वाढत असते; त्यामुळे कामगारांनाही जादा काम करावे लागत होते. रोज सरासरी २०० टन कचरा उचलला जातो; मात्र गेल्या तीन दिवसांत हे प्रमाण २२५ ते २३० टनांपर्यंत पोहोचले. तीन दिवसांत एकूण ६७५ ते ६९० टन कचरा उचलला गेला; त्यामुळे वाहनांच्या जादा फेऱ्या होत राहिल्या. अद्यापही काही कचरा ठिकठिकाणी पडला असून, तो उचलण्यास दोन दिवस लागतील, असे सांगण्यात आले.सफाई कामगारांना दिवाळी दिवशीच एक दिवसाची सुट्टी होती. लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज असे तीन दिवस या कामगारांना काम करावे लागले. सफाई कामगारांबरोबरच आरोग्य निरीक्षक, विभागीय आरोग्य निरीक्षक यांच्यासह स्वच्छता विभागाचे कार्यालयीन कर्मचारीही कामावर होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाDiwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर