शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ फुटबॉल लीग : चुरशीच्या लढतीत ‘ऋणमुक्तेश्वर’ची उत्तरेश्वरवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:11 IST

कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या के. एस. ए. वरिष्ठ फुटबॉल लीग स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर १-० अशा चुरशीच्या लढतीत मात केली. हा विजयी गोल ऋणमुक्तेश्वरच्या तुषार पुनाळकरने केले.

ठळक मुद्देचुरशीच्या लढतीत ‘ऋणमुक्तेश्वर’ची उत्तरेश्वरवर मातके.एस.ए. वरिष्ठ फुटबॉल लीग; तुषार पुनाळकरचा एकमेव विजयी गोल

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या के. एस. ए. वरिष्ठ फुटबॉल लीग स्पर्धेत ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर १-० अशा चुरशीच्या लढतीत मात केली. हा विजयी गोल ऋणमुक्तेश्वरच्या तुषार पुनाळकरने केले.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी दुपारी दोन संघात साखळी फेरीतील सामना झाला. सामन्यांच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान चाली रचल्या; त्यामुळे उपस्थितांना दोन्ही संघांचा वेगवान खेळ पाहण्यास मिळाला. ऋणमुक्तेश्वरकडून अनिरूद्ध शिंदे, तुषार पुनाळकर, ऋषिकेश पाडळकर, तर उत्तरेश्वरकडून स्वप्निल पाटील, सत्यतेज पाटील, स्वराज पाटील, सुयश हांडे, अभिजित शिंदे यांनी चांगला खेळ केला. पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले.उत्तरार्धात दोन्ही संघांनी आघाडी घेण्यासाठी खेळात बदल करीत शॉर्ट पासिंगचा अवलंब केला. आक्रमणाची धार दोन्ही संघांकडून वाढविण्यात आली. ७२ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीवर तुषार पुनाळकरने गोल करीत ऋणमुक्तेश्वर संघाला १-० आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सामना बरोबरीत आणण्यासाठी उत्तरेश्वरकडून वेगवान चाली रचल्या; मात्र, त्यांना सामना बरोबरीत आणण्यासाठी गोल करता आला नाही. अखेरीस १-० याच गोलसंख्येवर सामना ऋणमुक्तेश्वर संघाने जिंकला.

आजचा सामनादु. १.४५ वाजता. कोल्हापूर पोलीस विरूद्ध दिलबहार तालीम ‘ब ’

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर