शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-के.एस.ए. लीग फुटबॉल स्पर्धा: पाटाकडीलकडून दिलबहार पराभूत, सामन्यांत तीन रेडकार्ड

By सचिन भोसले | Updated: December 28, 2023 19:14 IST

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ (अ) गट लीग फुटबाॅल स्पर्धेत तुषार बिश्वकर्मा, ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, आदित्य कल्लोळी यांच्या गोलच्या ...

कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ (अ) गट लीग फुटबाॅल स्पर्धेत तुषार बिश्वकर्मा, ओंकार मोरे, प्रथमेश हेरेकर, आदित्य कल्लोळी यांच्या गोलच्या जोरावर पाटाकडील तालीम मंडळ(अ) ने दिलबहार तालीम मंडळ (अ) चा ४-१ असा पराभव केला.छत्रपती शाहू स्टेडीयमवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी या दोन संघात सामना झाला. सामन्याच्या सुरुवाातीपासून पाटाकडीलच्या ओंकार पाटील, प्रथमेश हेरेकर, ओंकार मोरे, नबीखान, तुषार बिश्वकर्मा, आदित्य कल्लोळी,ऋषिकेश मेथे पाटील यांनी वेगवान चाली रचत दिलबहारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यास २६ व्या मिनिटास यश आले. ओंकार मोरेने दिलेल्या पासवर तुषार बिश्वकर्माने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर पुन्हा २९ व्या मिनिटास डि च्या बाहेरून डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर ओंकार मोरेने अप्रतिम गोलची नोंद करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर दिलबहारकडून पवन माळी, स्वयंम साळोखे, सतेज साळोखे, रोहन दाभोळकर, सुशांत अतिग्रे यांनी आक्रमक व वेगवान चाली रचल्या. सामन्यांच्या ४० व्या मिनिटास अक्षय मेथे पाटीलने पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात धोकादायकरित्या अडविले. याबद्दल पंचांनी दिलबहार संघास पेनॅल्टी बहाल केली. यावर विष्णू विठलने गोल करीत आघाडी २-१ अशी कमी केली.उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान आणि चुरशीचा खेळ केला. सामन्याच्या ६८ व्या मिनिटास पाटाकडीलच्या प्रथमेश हेरेकरने मैदानी गोल करीत संघाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. त्यांनतर ७२ व्या मिनिटास पाटाकडीलच्या नबीखानने दिलेल्या पासवर आदित्य कल्लोळीने गोलची नोंद करीत संघाला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. याच गोल संख्येवर जिंकला. सामन्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या नेतृत्वाखाली तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तिघांना रेडकार्डसामन्यांत अखिलाडीवृत्तीचे दर्शन घडविल्याबद्दल ऋषिकेश मेथे पाटील (पाटाकडील) रोहन दाभोळकर व सुमित घाटगे (दिलबहार) यास दोन यलो झाल्याने रेडकार्ड पंचांनी देत मैदानाबाहेर काढले.आजचा सामनादु. १.०० वा. संध्यामठ तरूण मंंडळ विरुद्ध सोल्जर्स ग्रुप(दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ व संयुक्त जुना बुधवार यांच्या सामना होणार होता. मात्र खंडोबा संघातील चार खेळाडू आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा साठी शिवाजी विद्यापीठ संघात निवडले गेले आहेत. त्यामुळे नियमानुसार हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल