शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विजयोत्सवाच्या सरींनी कोल्हापूरचा शाही दसरा साजरा, पावसानंतरही उत्साह कायम 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 12, 2024 19:25 IST

Kolhapur News: करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा विजयोत्सव, छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूरला लाभलेला संस्थानकालीन परंपरेचा वारसा, धर्मसत्ता आणि राजसत्तेचा सुंदर मिलाप असलेला कोल्हापूरचा शाही दसरा शनिवारी विजयोत्सवाच्या सरींनी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.

- इंदुमती सूर्यवंशी कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा विजयोत्सव, छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराजांमुळे कोल्हापूरला लाभलेला संस्थानकालीन परंपरेचा वारसा, धर्मसत्ता आणि राजसत्तेचा सुंदर मिलाप असलेला कोल्हापूरचा शाही दसरा शनिवारी विजयोत्सवाच्या सरींनी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. नुकत्याच कोसळून गेलेल्या पावसाने अवकाशात उमटलेले इंद्रधनुचे रंग, ढगा आडून डोकावणारी  सूर्याची मावळतीची किरणे, अंबाबाई तुळजाभवानीच्या पालख्या, शाहू छत्रपतींच्या हस्ते शमी पूजन, बंदुकीच्या फैरी झाडून सलामी... अशा देखण्या आणि शाही सोहळ्याने ऐतिहासिक दसरा चौकात सिमोल्लंघनाचा कार्यक्रम रंगला.

शनिवारी सायंकाळी ५ वाजता पावसाला सुरुवात झाली या पावसातच भवानी मंडपातून शाही मिरवणूक सुरू झाली. मात्र अर्ध्या तासांनी पाऊस थांबला आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. खासदार शाहू छत्रपतींच्या स्वागतासाठी न्यू पॅलेस ते दसरा चौक मार्गावरून बुलेटस्वार, पोलिस एस्कॉर्ट व छत्रपती घराण्यातील वाहने अशी मिरवणूक निघाली. सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी शाहू छत्रपती यांचे ऐतिहासिक मेबॅक कार मधून दसरा चौकात आगमन झाले. त्यांच्या हस्ते शमीपूजन व देवीची आरती झाल्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, कोल्हापूर महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आमदार जयश्री जाधव, उद्योगपती संजय डी पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर माजी खासदार राजू शेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह सरदार घराण्यातील मान्यवर, शासकीय अधिकारी, अंबाबाई, तुळजाभवानी मंदिराचे मानकरी, श्रीपूजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिमोल्लंघनाच्या साेहळ्यानंतर आसमंतात भव्य आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर मेबॅक कारमध्ये उभे राहून छत्रपतींनी जनतेकडून सोने स्विकारले. त्यानंतर त्यांचे भवानी मंडप येथे आगमन झाले.दुसरीकडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट मार्गे रात्री उशीरा मंदिरात आली.  मिरवणुकीने स्वागतशाही दसरा महोत्सवांतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने अंबाबाई व तुळजाभवानी देवीच्या पालख्यांचे जंगी मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. धनगरी ढोल पथ, बैलगाड्या, तोफगाड्या, घोड्यांवर स्वार झालेले मावळे, अब्दागिरी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोल, लेझीम पथके, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, मल्लखांब अशा कलांच्या सादरीकरणाने भवानी मंडप ते दसरा चौक ही मिरवणूक काढण्यात आली. अंबाबाईची रथारुढ पूजामहिषासुराचा वध केल्यानंतर करवीर निवासिनी श्री अंबाबाई विजयोत्सव साजरा करण्यासाठी रथावर आरुढ होऊन निघाली आहे यारुपात दसऱ्याला देवीची पूजा बांधण्यात आली. अश्विन पौर्णिमेला महाप्रसादाने अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची सांगता होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDasaraदसराShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती