शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सीपीआर प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकावर चाकू हल्ला, आरोपी पसार, दुचाकीस प्रवेश नाकारल्याने कृत्य

By भीमगोंड देसाई | Updated: May 26, 2023 20:48 IST

Crime News: कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या चाकू हल्ल्यात महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान पवन संजय कदम हा जखमी झाला. दुचाकीस प्रवेश नाकारल्याने संशयिताने धारदार चाकूने हल्ला केला.

- भीमगोंडा देसाई कोल्हापूर : येथील सीपीआर रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या चाकू हल्ल्यात महाराष्ट्र सुरक्षा दलाचा जवान पवन संजय कदम (वय २६, रा. इस्लामपूर, जि. सांगली) हा जखमी झाला. दुचाकीस प्रवेश नाकारल्याने संशयिताने धारदार चाकूने हल्ला केला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. हल्यानंतर संशयित आरोपी पसार झाला. तो सीपीआरमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पथकातील जवान प्रवेशद्वारासह प्रथमोपचार केंद्रात तैनात असतात. या वेळेत रुग्णांशिवाय नातेवाईक व नागरिकांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. संशयित आरोपी सकाळी १० वाजता सीपीआरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुचाकीवरून आला. जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला जवान कदम सह इतर सहकाऱ्यांनी त्याला अडविले. त्यानंतर तो मी कोण आहे माहीत नाही...? मला आत सोडा, असे मोठा आवाज करून सांगण्याचा प्रयत्न केला. जवानांनी त्याला जुमानले नाही. त्यावर संशयिताने दुचाकी भिंतीजवळ पार्क केली. पवनला उद्देशून तुला ठार मारतो, अशी धमकी देवून रुग्णालय आवारात असलेल्या घराच्या दिशेने पळत सुटला. दहा पंधरा मिनिटांनंतर धारदार चाकू घेवून संशयित प्रवेशद्वारावर आला. पवनसह कर्तव्य बजावत असताना त्या आराेपीने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. हल्ला चुकविण्याच्या प्रयत्नात पवनच्या हाताला इजा झाली. कमरेला तसेच पोटाजवळही दुखापत झाली. सुरक्षा रक्षकांसह काही नागरिक हल्लेखोराला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. याची प्राथमिक नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर