शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव १ आक्टोंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:50 IST

नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १ ते ४ आक्टोंबर २0१८ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. किर्लोस्कर आॅईल इंजिनचे व्ही. एम. देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अनिल अवचट यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देकिर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव १ आक्टोंबरपासूनव्ही.एम. देशपांडे यांची माहिती, अनिल अवचट उद्घाटक

कोल्हापूर : नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १ ते ४ आक्टोंबर २0१८ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. किर्लोस्कर आॅईल इंजिनचे व्ही. एम. देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक अनिल अवचट यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या या महोत्सवाची ‘प्रदूषण रोखा, नदी वाचवा’ही संकल्पना असून, यावर आधारित विविध उपक्रम यानिमित्ताने होणार आहेत. या महोत्सवामध्ये ३५ हून अधिक चित्रपट दाखविण्यात येणार असून, याचबरोबर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ९ संस्था आणि व्यक्तींचाही गौरव यावेळी करण्यात येणार असल्याचे पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी सांगितले.‘वस्त्रोद्योग व नदी प्रदूषण’ हा परिसंवाद इचलकरंजी येथील डीकेटीई येथे होणार असून, ‘नदी प्रदूषण रोखण्यासाठी तंत्रज्ञान’ या विषयावर परिसंवाद तर ‘नदी प्रदूषणाची कारणे आणि उपाय’ या विषयावर युवासंसद होणार आहे. याच विषयावर पोस्टर प्रदर्शन स्पर्धाही घेण्यात येणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘रिव्हर अँड फन’,‘ पर्यावरणपूरक सजावट’ उपक्रम घेण्यात येणार असल्याचे राहुल पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाऊसाहेब सूर्यवंशी, अ‍ॅड. केदार मुनीश्वर, अनिल चौगुले, विजय टिपुगडे उपस्थित होते.

पर्यावरणपूरक वस्तूंना प्राधान्यया महोत्सवामध्ये फ्लेक्स, प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर अजिबात करण्यात येणार नाही. कार्यक्रम स्थळावरील सर्व फलक हे कापडी राहणार असून, यामुळे कलाकारांनाही काम करण्याची संधी मिळणार असल्याचे उदय गायकवाड यांनी सांगितले. 

 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूर