शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : किरण लोहार यांनी स्वीकारला कार्यभार, स्थगिती मिळाल्याने जिल्हा परिषदेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 19:13 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या एकतर्फी मुक्ततेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट)ने स्थगिती दिल्याने लोहार यांनी गुरुवारी दुपारनंतर जिल्हा परिषदेत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आज शुक्रवारी ते शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार घेण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकिरण लोहार यांनी स्वीकारला कार्यभारस्थगिती मिळाल्याने जिल्हा परिषदेत दाखल

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या एकतर्फी मुक्ततेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट)ने स्थगिती दिल्याने लोहार यांनी गुरुवारी दुपारनंतर जिल्हा परिषदेत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. आज शुक्रवारी ते शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार घेण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी झाल्यानंतर त्यांना रजेवर पाठवून चौकशीचा निर्णय झाला होता. त्यानुसार पाचजणांची चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली आहे; परंतु सभेचे इतिवृत्त पाहिल्याशिवाय लोहार यांना रजेवर पाठविणार नाही, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतली होती; पण जेव्हा इतिवृत्त मिळाले तेव्हा मात्र ५ आॅक्टोबर रोजी लोहार यांना मित्तल यांनी एकतर्फी कार्यमुक्त केले होते.यानंतर चौकशी समितीची एक बैठक होऊन लोहार यांच्याविरोधातील तक्रारी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ६० हून अधिक तक्रारी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. याच दरम्यान लोहार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या एकतर्फी कार्यमुक्तीच्या आदेशाला ‘मॅट’मध्ये आव्हान दिले होते.सुनावणीमध्ये लोहार यांच्या वकिलांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरण्यात आली. लोहार हे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ या प्रशासन शाखेचे राजपत्रित अधिकारी असल्यामुळे त्यांची बदली करणे, कार्यमुक्त करणे, शिस्तभंगविषयक कारवाई करणे हे सर्व अधिकार महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे अधिकार नाहीत, हे लोहार यांच्या वकिलांचे म्हणणे ग्राह्य धरून त्यांच्या कार्यमुक्तीला मंगळवारी स्थगिती देण्यात आली.बुधवारी (दि. २४) लोहार यांना या स्थगिती आदेशाची प्रत मिळाली. यानंतर गुरुवारी लोहार दुपारनंतर जिल्हा परिषदेत आले आणि त्यांनी आपल्या मूळ पदाचा कार्यभार स्वीकारला. तसेच त्यांनी आपला हजर अहवालही अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागाला पाठवून दिला.

चौकशी समितीची बैठक १ नोव्हेंबरला दरम्यान, लोहार यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीची बैठक १ नोव्हेंबरला बोलावण्यात आली आहे. तोपर्यंत या तक्रारींची छाननी करण्यात येत असून, यावेळी काहीजणांना सुनावणीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर