शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्रत्येकाच्या घरी ‘खादी’ पोहोचली पाहिजे : धनंजय महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:38 IST

सर्वसामान्यांना स्वावलंबन, श्रमाला प्रतिष्ठा आणि गरिबातील गरिबालाही चरख्यावर सूतकताई करून काम मिळेल; त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खादी पोहोचली पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे

ठळक मुद्देखादी भांडार नूतनीकरण समारंभ; ४० चरख्यांची मागणीत्याचा प्रस्ताव मी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करतो, असे आश्वासन दिले.

कोल्हापूर : सर्वसामान्यांना स्वावलंबन, श्रमाला प्रतिष्ठा आणि गरिबातील गरिबालाही चरख्यावर सूतकताई करून काम मिळेल; त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खादी पोहोचली पाहिजे, असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघातर्फे मंगळवारी महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त चरखापूजन व खादी भांडार नूतनीकरण उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

खासदार महाडिक म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वदेशीचा महामंत्र दिला. चरख्यावर खादी कपडे निर्मिती करण्याच्या कलेचा प्रचार केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर खादीनिर्मिती हे लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले. काळाच्या ओघात खादी व ग्रामोद्योगाला उतरती कळा लागली. यावर अवलंबून असणारे लाखो लोक बेरोजगार झाले. काळाच्या ओघात खादीची विक्री कमी झाली आहे. खादीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाखादी’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात एक खादी गेली पाहिजे; तरच खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींच्या तत्त्वाचे आचरण होईल.

गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते झाल्यावर चरखापूजन झाले. यावेळी प्रास्ताविक करताना संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी खासदार महाडिक यांच्याकडे सौरऊर्जेवर चालणाºया चरख्यांची व एका मोबाईल व्हॅनची मागणी केली. यावर महाडिक यांनी त्याचा प्रस्ताव मी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करतो, असे आश्वासन दिले.

यावेळी महात्मा गांधी अध्यासनाच्या डॉ. भारती पाटील, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे प्राचार्य व्ही. डी. माने, प्रा. आशाताई कुकडे, दादासाहेब जगताप, प्रा. गीता गुरव, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अनुराधा भोसले, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, प्रा. सुधीर देसाई, राजेश घोरपडे, सविता देसाई, सचिव एस. एल. तुपद, प्रकाश चौगुले यांसह सर्वोदय कार्यकर्ते उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीkolhapurकोल्हापूर