शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘स्वातंत्र्यदिना’संदर्भातील सर्व जबाबदाऱ्या सुरळीत पार पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 16:55 IST

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनाचा मुख्य समारंभ बुधवारी (१५ आॅगस्ट) सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदाऱ्या सुरळितपणे पार पाडाव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी शनिवारी येथे दिल्या.

ठळक मुद्दे‘स्वातंत्र्यदिना’संदर्भातील सर्व जबाबदाऱ्या सुरळीत पार पाडानिवासी उपजिल्हाधिकारी : आढावा बैठक

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनाचा मुख्य समारंभ बुधवारी (१५ आॅगस्ट) सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदाऱ्या सुरळितपणे पार पाडाव्यात, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी शनिवारी येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या तयारीची आढावा बैठक झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारीस, करवीरचे प्रभारी तहसीलदार गणेश शिंदे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील, निवडणूक तहसीलदार सविता लष्करे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अविनाश पोळ, नायब तहसीलदार प्रकाश दगडे, आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व कामे संबंधित विभागांनी वेळीच व सुरळीत पार पाडावीत, अशी सूचना सर्व यंत्रणांना केली. तसेच प्लास्टिकचे झेंडे वापरू नयेत, ध्वजाचा योग्य सन्मान राखण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही केले.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांच्या तयारीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी एस. आर. माने, गणेश शिंदे, प्रकाश दगडे, सविता लष्करे, डॉ. स्टिव्हन अल्वारीस, अजित पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी