शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

कोल्हापूर : जयंती नदीचा ‘हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर’ मार्ग होणार प्रदूषणमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:15 IST

जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिनानिमित्त असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सतर्फे  जयंती नदी ते गोमती नदीतीरावर परिक्रमा काढण्यात आली. या परिक्रमेचा मार्ग हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर असा होता. पायलट प्रोजेक्ट म्हणून या मार्गाचा परिसर प्रदूषणमुक्त करण्याचा उपक्रम असोसिएशनतर्फे राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देजयंती नदीचा ‘हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर’ मार्ग होणार प्रदूषणमुक्तअसोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅँड इंजिनिअर्सचा उपक्रम; परिक्रमाद्वारे पाहणी

कोल्हापूर : जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिनानिमित्त असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्सतर्फे  जयंती नदी ते गोमती नदीतीरावर परिक्रमा काढण्यात आली. या परिक्रमेचा मार्ग हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर असा होता. पायलट प्रोजेक्ट म्हणून या मार्गाचा परिसर प्रदूषणमुक्त करण्याचा उपक्रम असोसिएशनतर्फे राबविला जाणार आहे.असोसिएशनने ‘जागे व्हा पंचगंगेसाठी’ या मोहिमेचा भाग म्हणून जयंती नदीचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्याचे ठरविले आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर या मार्गाची निवड केली आहे.

अंदाजे १४.७ किलोमीटर म्हणजे कात्यायनी ते कळंबा कारागृह हा भाग अजूनही फारसा प्रदूषित झालेला नाही. तो त्याच पद्धतीने राहावा यासाठी प्रस्ताव तयार करणे सुरू आहे. उर्वरित प्रदूषित भागापैकी असोसिएशनने पायलट प्रोजेक्टसाठी निवडलेल्या भागामध्ये लवकरच प्रत्यक्ष कामाची सुरुवात करणार आहे. 

असोसिएशन आॅफ टेक्नोक्रॅटस्चे अध्यक्ष राजेंद्र सावंत म्हणाले, कॉर्पोरेशनची ड्रेनेज सिस्टीम सन १९७० च्या आसपास अस्तित्वात आली आहे. त्यावेळी जयंती नदीमध्ये स्वच्छ पाणीवहन होत होते. आज महानगरपालिकेची ड्रेनेज सिस्टीम असताना जयंती नदीची ही अवस्था आहे, तिचा विचार व्हावा.यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्टचे विजय कोराणे, या प्रकल्पाच्या समन्वयक वंदना पुसाळकर, इंजिनिअर आर. के. पाटील, नगरसेवक विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, असोसिएशनचे माजी अध्यक्ष संदीप घाटगे, सदस्य प्रसाद मुजुमदार, महेश जाधव यांनी मते मांडली.

यावेळी अतुल दिघे, जीवन बोडके, सुधीर हंजे, महेश ढवळे, श्रीकांत भोसले, मंदार आंबेकर, अनिल घाटगे, प्रशांत काटे, प्रमोद पवार, विजय पाटील, सुनील मांजरेकर, प्रशांत हडकर, आदी उपस्थित होते.

निधी देणारया परिक्रमेच्या प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांना मोबाईलवरून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूर