शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : तीन तलाकचा मुद्दा राजकीय स्वार्थापोटी, मुस्लिम समाजातील महिलांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 20:11 IST

इस्लाम धर्मात महिलांना अतिशय सन्मानाची व पुरुषांच्या बरोबरीची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे सरकारने तीन तलाकच्या कायद्याच्या विधेयकावरून धार्मिक हस्तक्षेप करू नये, अशी मागणी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे शुक्रवारी येथे केली.

ठळक मुद्देतीन तलाकचा मुद्दा राजकीय स्वार्थापोटीमुस्लिम समाजातील महिलांचे निवेदन धार्मिक बाबतीत सरकारने हस्तक्षेप करू नये

कोल्हापूर : इस्लाम धर्मात महिलांना अतिशय सन्मानाची व पुरुषांच्या बरोबरीची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे सरकारने तीन तलाकच्या कायद्याच्या विधेयकावरून धार्मिक हस्तक्षेप करू नये, अशी मागणी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांनी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे शुक्रवारी येथे केली.

हा मुद्दा निव्वळ राजकीय स्वार्थापोटी उपस्थित करण्यात आला असून अधिवेशनापूर्वी दोन्ही सभागृहांत राष्ट्रपतींनी या विधेयकावर केलेले भाषण खेदजनक असून त्यांच्या भाषणातून हा भाग वगळावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

दुपारी बाराच्या सुमारास सर्व मुस्लिम समाजातील महिला ‘आम्ही शरियत कायद्याशी बांधील आहोत’, ‘आम्ही तीन तलाक कायद्याचा विरोध करतो’, असे फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र आल्या. या ठिकाणी नगरसेविका नीलोफर आजरेकर यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी श्ािंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

तीन तलाक कायद्याला विरोध करत हा कायदा मागे घ्यावा, या मागणीचे निवेदन शुक्रवारी मुस्लिम समाजातील महिलांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. यावेळी नगरसेविका नीलोफर आजरेकर आदी उपस्थित होते.  (छाया : नसीर अत्तार)

निवेदनात म्हटले आहे की, आम्ही शरियत कायद्याशी बांधील आहोत. ‘मुस्लिम महिला सुरक्षा कायदा-२०१७’ बनविताना मुस्लिम धर्मगुरू किंवा मुस्लिम अभ्यासकांचे मत घेण्यात आलेले नाही. हा कायदा संविधानाच्या विरोधात असून अत्यंत गडबडीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील महिला व मुलांच्या हिताला बाधा येणार असून तो रद्द करण्यात यावा.

अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांत भाषण करून त्यामध्ये या कायद्याविषयी भाष्य केले होते. त्यांनी मुस्लिम महिलांविषयी केलेले विधान अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणातून हा भाग वगळण्यात यावा तसेच सरकारने धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये.यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, माजी नगरसेवक आदिल फरास, मन्सूर कासमी, अबूकर मुल्ला, यास्मिन पटणकुडी, बिल्कीश सय्यद, वहिदा बागवान, नाजिया शेख, यास्मिन शेख यांच्यासह हिलाल कमिटी, कोल्हापूर शहर मजलिसे ऐ शोरा, मुस्लिम पर्सनल लॉ, दारूल कजा, जमयितुल उलमा, कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, सलोखा मंच व मुस्लिम ओबीसी संघटनेचे सदस्य, महिला उपस्थित होते. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtriple talaqतिहेरी तलाकMuslimमुस्लीम