शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आयपीएल क्रिकेट बेटिंग रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 19:36 IST

कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर व राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातील बुकीवर छापा टाकून पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामना बेटिंग रॅकेटचा सोमवारी (दि. २३) रात्री पर्दाफाश केला.

ठळक मुद्देआयपीएल क्रिकेट बेटिंग रॅकेटचा कोल्हापुरात पर्दाफाशबुकींवर ‘स्थानिक गुन्हे’ची कारवाई; २७ जणांना अटकतीन लाख ४० हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर व राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातील बुकीवर छापा टाकून पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामना बेटिंग रॅकेटचा सोमवारी (दि. २३) रात्री पर्दाफाश केला.या प्रकरणी क्रिकेट बेटिंगच्या मालकासह २७ जणांना अटक केली असून, तीन लाख ४० हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, डेअरडेव्हिल्स दिल्ली व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील टी-२० सामन्यादरम्यान शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमध्ये दशरथ निवृत्ती निकम यांच्या फ्लॅटमध्ये सोमवारी (दि. २३) रात्री छापा टाकला. या छाप्यात ३० हजार ३९० रुपये, मोबाईल, लॅपटॉप, दूरचित्रवाणी संच व जुगाराचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या असे दोन लाख ८७ हजार ३९० रुपये असा एकूण तीन लाख १७ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.या प्रकरणी संशयित अस्लम अक्सरअली कांडगावे, उमेश रमेश गोंजारे (रा. शाहूपुरी सहावी गल्ली), नीलेश शंकर परदेशी, विक्रम पोपट गायकवाड (रा. जुना बुधवार पेठ), निशिकांत दत्तात्रय कनवाडे (शाहूपुरी सातवी गल्ली), संतोष भालचंद्र पेंडूरकर (तेली गल्ली, पापाची तिकटी), रोहित प्रदीप बनसोडे, हरिहर शिवदत्त सावंत, विकी सुरेंद्र बनसोडे, अनिकेत आनंदराव निंबाळकर, सागर बाबूराव पाटील, इम्रान आदम जमादार, राहुल चंद्रकांत बन्ने (शाहूपुरी पाचवी गल्ली), प्रवीण शामराव महापुरे (रा. राजारामपुरी चौथी गल्ली), अमित कौतुक राणे, नितीन सुभाष पाटील (मंगळवार पेठ), महेंद्र बाबूराव दामुगडे (१६, ई वॉर्ड, कदमवाडी), सुनील भिकाजी घाटगे (बोर तालमीजवळ, लक्षतीर्थ वसाहत), सुदर्शन पांडुरंग किरूळकर (रा. ११९१, ए वॉर्ड, राजाराम रोड), ओंकार महादेव चौगुले, प्रकाश दुडाप्पा गुडसे (रा. डफळे कॉलनी, उचगाव ), विकास संभाजी पाटील (रा. ८७६, ए वॉर्ड, शिवाजी पेठ) व क्रिकेट बेटिंगचा मालक गणेश योगेश काटे (रा. शाहूपुरी पाचवी गल्ली) यांना अटक केली. संशयित सनी ऊर्फ मिलिंद मोहन जाधव (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याचा शोध पोलीस घेत आहेत. तो किंग्ज ११ पंजाब विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स या सामन्याचे बेटिंग (सट्टा) घेऊन विविध इसमांची फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले.दुसरीकडे, राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्समधील गाळा नंबर पाचमध्ये टी-२० किंग्ज पंजाब विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्यातील टी-२० क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारत होते. त्यामध्ये २३ हजार १०० रुपयांच्या साहित्यासह मिळून आले.या प्रकरणी संशयित अमोल गणपती पोतदार (रा. १६६२, बी वॉर्ड, खरी कॉर्नर), वाशिम युनूस खली (रा. बालगोपाल तालीमजवळ), रोहित रवींद्र मोरे (रा. जुना बुधवार पेठ) व उत्तम रमेश गोंजारे (रा. शाहू मिल, कामगार भवनशेजारी, राजारामपुरी) यांना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक युवराज आठरे, सचिन पंडित, राजेंद्र सानप यांच्यासह हेड कॉन्स्टेबल श्रीकांत मोहिते, शिवाजी खोराटे, राजेश आडूळकर, राजेंद्र हांडे, संजय हुंबे, संजय पडवळ, संजय काशीद, आनंद निगडे, प्रकाश संकपाळ, सुभाष वरुटे, रवींद्र कांबळे, प्रदीप नाकील यांनी केली. 

 

टॅग्स :IPL 2018आयपीएल 2018kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाCricketक्रिकेट