शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

कोल्हापूर : पगारी पुजारी नियुक्तीसाठी मुलाखती, तोंडी परीक्षेसह प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:45 IST

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात उमेदवारांकडून तोंडी परीक्षेसह सालंकृत पूजेचे प्रात्यक्षिकही करवून घेण्यात येत असून गेल्या दोन दिवसांत ४० उमेदवारांनी तज्ज्ञ समितीसमोर मुलाखत दिली. गुरुवारी मुलाखतीचा अखेरचा टप्पा पार पडणार आहे.

ठळक मुद्देपगारी पुजारी नियुक्तीसाठी मुलाखतीतोंडी परीक्षेसह प्रात्यक्षिक

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात उमेदवारांकडून तोंडी परीक्षेसह सालंकृत पूजेचे प्रात्यक्षिकही करवून घेण्यात येत असून गेल्या दोन दिवसांत ४० उमेदवारांनी तज्ज्ञ समितीसमोर मुलाखत दिली. गुरुवारी मुलाखतीचा अखेरचा टप्पा पार पडणार आहे.शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो-सायन्स विभागामध्ये देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार, धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव यांच्या समितीच्यावतीने या मुलाखती घेतल्या जात आहेत.त्यात पहिल्या दिवशी ३६ व दुसऱ्या दिवशी ४० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. यावेळी समितीच्यावतीने उमेदवारांकडून त्यांची वैयक्तिक माहिती, वैदिक प्रमाणपत्र, पत्ता अशी माहिती भरून घेण्यात आली.

त्यानंतर घेतलेल्या मुलाखतीमध्ये मंदिराशी निगडित माहिती, मंदिर परंपरा, वेदशास्त्रातील श्लोक, मंत्र आणि पूजाशास्त्र, नवरात्रौत्सवातील धार्मिक विधी, किरणोत्सव, दीपोत्सव यांची माहिती विचारण्यात आली.

तोंडी मुलाखतीबरोबरच प्रत्येक उमेदवाराकडून देवीच्या प्रतिकृतीस साडी नेसविणे, दागिन्यांसह सालंकृत पूजा बांधण्याचेही प्रात्यक्षिक करवून घेण्यात आले. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारी मुलाखतीचा अखेरचा टप्पा पार पडणार आहे. 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर