शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी, डागडुजीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:28 IST

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी मंगळवारी कोल्हापूरची श्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी करून डागडुजीच्या तसेच मंदिराच्या शिखरावरील भेगा भरून घेण्याच्या सूचना केल्या.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी, डागडुजीच्या सूचना मंदिराच्या शिखरावरील भेगा भरून घेण्याच्या सूचना

कोल्हापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांनी मंगळवारी कोल्हापूरची श्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गळतीची पाहणी करून डागडुजीच्या तसेच मंदिराच्या शिखरावरील भेगा भरून घेण्याच्या सूचना केल्या.

मंदिरात पाणी साचून राहू नये यासाठी परिसरातील गटारी, चेंबर्सच्या स्वच्छतेसाठीही महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिरातील महाकाली मंदिरासमोर तसेच प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी गळती आहे.

जोराचा पाऊस झाला की देवस्थानच्या कार्यालयासमोर तळे साचते. बाह्य परिसरातूनही ठिकठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, अभियंता सुदेश देशपांडे यांनी मंदिराच्या परिसराची पाहणी केली.यावेळी त्यांनी शिखराच्या आजूबाजूस टेरेसवर पडलेल्या भेगा तत्काळ भरून घ्याव्यात, ओवऱ्यांवरील गळती बंद करावी, मंदिरामध्ये जमा होणाऱ्या  पाण्याचा निचरा होण्यासाठी परिसरातील गटारी, चेंबर तत्काळ स्वच्छ करून घ्यावीत व पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या.

बाह्य परिसरातही महापालिकेच्या हद्दीतील गटारी स्वच्छ करून घेण्याबाबत पत्रव्यवहार, मंदिरावर उगविलेली छोटी झुडपे काढणे, अनावश्यक वस्तू काढून टाकणे, संपूर्ण मंदिरामध्ये पावसामुळे कोठेही शेवाळ होऊन भाविक पडणार नाहीत किंवा कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या.

मातुलिंग मंदिरातील दगडी भिंतीवरील रंग काढून त्याचे मूळ स्वरूप खुलविणे, महाद्वार दरवाजावरील निसटलेले दगड तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने व्यवस्थित करण्याबाबतही सूचना केल्या.सचिवांचे दुर्लक्ष... समितीची नाराजीसुट्या आणि अधिक महिना यांमुळे गेले महिनाभर अंबाबाई मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. भाविकांच्या रांगाच्या रांगा भवानी मंडपापर्यंत जात असून अंतर्गत भागात गर्दीमुळे गुदमरल्यासारखे होते, एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सेवा देण्यासाठी समितीचे पदाधिकारी धडपडत असले तरी सचिवांनी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. मंदिराचे व्यवस्थापन पाहण्याची पहिली जबाबदारी सचिवांची असताना ते फिरकलेही नाहीत, अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.

 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर