शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मिस कॉल, संदेशातून मिळते ‘पीएफ’च्या पैशांची माहिती, कोल्हापूर ‘पीएफ’ कार्यालयाकडून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 13:10 IST

कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) च्या खात्यावर किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती आता एका मिस कॉल व मोबाईल संदेशातून संबंधित खातेदाराला मिळत आहे. कोल्हापूर विभागीय कार्यालयात याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देमिस कॉल, संदेशातून मिळते ‘पीएफ’च्या पैशांची माहितीकोल्हापूर ‘पीएफ’ कार्यालयाकडून अंमलबजावणी

प्रवीण देसाई

कोल्हापूर : कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) च्या खात्यावर किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती आता एका मिस कॉल व मोबाईल संदेशातून संबंधित खातेदाराला मिळत आहे. कोल्हापूर विभागीय कार्यालयात याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत कर्मचारी भविष्य निधी (पीएफ) कार्यालयातर्फे ‘पीएफ’ संदर्भात आॅनलाईन कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने ‘उमंग’ अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

यामध्ये ‘पीएफ’चा दावा (क्लेम) करून संगणकीय पोर्टल किंवा ‘उमंग’ अ‍ॅपद्वारे कर्मचारी आपले पैसे काढू शकतात. या अ‍ॅपमध्ये आणखी सुविधा करण्यात आली असून त्याद्वारे एका मिस कॉल व मोबाईल संदेशातून खातेदाराला ‘पीएफ’च्या खात्यावरील पैशाची माहिती मिळणार आहे.या आॅनलाईन प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांना भविष्य निधी कार्यालयाकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच त्यासाठी प्रत्यक्ष सहीची किंवा कागदपत्रांची गरज लागणार नाही; परंतु त्यांना काही शर्तींची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये पहिल्यांदा कर्मचाऱ्यांनी ‘युनिव्हर्सल’ क्रमांक सक्रिय (अ‍ॅक्टिव्हेट) करावा लागणार आहे.

‘युनिव्हर्सल’ क्रमांकधारक कर्मचाऱ्यांना आपले आधार क्रमांक व बॅँक खाते क्रमांक हे ‘युनिव्हर्सल’ क्रमांकासोबत लिंक करावे लागणार आहेत. त्याचबरोबर मोबाईल क्रमांकातील सीम कार्डला आधार क्रमांक लिंक करावा.

ही पुर्तता केल्यानंतर खातेदाराने कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या क्रमांकावर आपल्या मोबाईलद्वारे मिस कॉल किंवा संदेश पाठविल्यास काही वेळातच त्यांच्या माहिती संदेशाद्वारे मिळणार आहे.

‘कोल्हापूर’मध्ये ९००० आस्थापना अन ११ लाख खातेदारभविष्य निधीच्या कोल्हापूर कार्यालयांतर्गत कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे येतात. या विभागात सुमारे ९००० आस्थापना असून त्यामध्ये जवळपास ११ लाख भविष्य निधीधारक कर्मचारी संलग्न आहेत.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ४०००, सातारा जिल्ह्यात १५००, सांगली जिल्ह्यात १५००, रत्नागिरीमध्ये १५००, सिंधुदुर्गमध्ये ५०० आस्थापनांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोल्हापूर विभागात ५० ‘एमआयडीसीं’चा ही समावेश आहे.

या क्रमांकावर साधावा संपर्क‘पीएफ’ खात्यावर जमा केलेल्या पैशाची माहिती खातेदाराला मिळण्यासाठी कोल्हापूर कार्यालयाने मोबाईल व दुरध्वनी क्रमाकं उपलब्ध करुन दिले आहेत. यामध्ये ‘७७३८२९९८९९’ या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल व ‘०११-२२९०१४०६’ या दुरध्वनी क्रमांकावर मोबाईलवरुन संदेश पाठविल्यास काही क्षणातच खातेदाराच्या मोबाईलवर पैसे किती जमा आहेत याबाबतचा संदेश येतो. याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर