शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : उद्योग क्षेत्राने जगभरातील नवतंत्रज्ञान स्वीकारावे : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 11:31 IST

उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देउद्योग क्षेत्राने जगभरातील नवतंत्रज्ञान स्वीकारावे : चंद्रकांत पाटीलवेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स् प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन

कोल्हापूर : उद्योग-व्यवसाय क्षेत्रात नवे काय चालले आहे. ते समजावून देण्याचे माध्यम म्हणून ‘वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स्’ हे औद्योगिक प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जगभरातील नवतंत्रज्ञान, चांगले प्रयोग कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्राने स्वीकारावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे कोल्हापुरात दि. १५ ते १८ डिसेंबर दरम्यान वेस्टर्न महाराष्ट्र कन्वर्जन्स् २०१८ हे औद्योगिक प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाच्या माहितीपत्रकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संचालक जयेश ओसवाल, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘स्टार्ट अप’मधील संकल्पनांना बळ दिले पाहिजे. नवीन उद्योग, उद्योजक पुढे येण्यासाठी त्यांना केवळ भांडवल उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर त्यांच्या उद्योग उभारणीला आवश्यक ती मदत केली पाहिजे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदीपभाई कापडिया, धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.

मेक इन वेस्टर्न महाराष्ट्र संकल्पनाया कार्यक्रमात ‘महाराष्ट्र चेंबर’चे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्तविकात या प्रदर्शनाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मेक इन वेस्टर्न महाराष्ट्र’ अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे. त्यात देशविदेशातील विविध कंपन्या सहभागी होणार आहेत. व्यापार-उद्योग क्षेत्राशी संबंधित शासनाच्या नवीन योजना, जगभरातील नवतंत्रज्ञान आणि संधी, आदींबाबत चर्चासत्रे होणार आहेत. कोल्हापुरात गूळ आणि संरक्षण विभागाला लागणाऱ्या साधनसामुग्री उत्पादनाचे क्लस्टर व्हावे.

व्यावसायिकांचे प्रश्न समजून घेणारविमानतळ नियमित सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठ दिवसांत कोल्हापुरात विविध व्यावसायिक, त्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करणार आहे. त्यातून त्यांचे प्रश्न समजून घेणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर