कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नोंदणीला वाढता प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:50 PM2018-12-24T16:50:37+5:302018-12-24T16:53:37+5:30
‘आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत ‘लोकमत’ने कोल्हापूरमध्ये दि. ६ जानेवारी रोजी महामॅरेथॉन आयोजित केली आहे. ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत आहे. स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून नावनोंदणीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत.
कोल्हापूर : ‘आरोग्यासाठी धावा’ अशी साद देत ‘लोकमत’ने कोल्हापूरमध्ये दि. ६ जानेवारी रोजी महामॅरेथॉन आयोजित केली आहे. ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेच्या नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत आहे. स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून नावनोंदणीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत.
करवीरनगरीमध्ये होणाऱ्या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वासाठी धडाक्यात नोंदणी सुरू आहे. यावर्षी महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटर अंतराची राहणार आहे. ती सर्व वयोगटांसाठी खुली आहे.
लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली मेडल्स देण्यात येणार आहेत.
नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत. धावपटूने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे, नागपूरमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा बनणार आहे.
या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून हे मेडल पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत गुरुवार (दि. २०)पर्यंत होती. मात्र, वाढता सहभाग लक्षात घेऊन लोकाग्रहास्तव सहभाग नोंदणीसाठी आणखी सहा दिवसांची वाढ केली आहे. बुधवारपर्यंत (दि.२६) नोंदणीसाठी अंतिम मुदत आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क
या महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.
अबालवृद्ध धावणार
कोल्हापूर शहर, जिल्ह्यातील मॅरेथॉनपटू, आयर्नमॅन, हौशी धावपटू, मास्टर्स अॅथलिट आणि सर्वसामान्य कोल्हापूरकर आपल्यासह कुटुंबाचाही सहभाग नोंदणी करीत आहेत. विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, संघटना, सामाजिक संघटना, क्रीडा संघटना, विविध प्रकारचे क्रीडा क्लब व उद्योगसमूहही आपल्या कर्मचाऱ्यांसह महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आबालवृद्ध या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वात धावताना दिसणार आहेत.
सहा लाखाची बक्षीसे
दुसऱ्या पर्वातील महामॅरेथॉनला नाशिक येथून सुरुवात झाली आहे. यात नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे महामॅरेथॉन उदंड प्रतिसादात पार पडली. आता कोल्हापुरात ६ जानेवारी रोजी तिसरी महामॅरेथॉन होणार आहे. त्यानंतर नागपूर येथे ३ फेबु्रवारी आणि १७ फेबु्रवारी २०१९ ला पुणे येथे महामॅरेथॉन होत आहे.
कोल्हापुरात होणारी ही महामॅरेथॉन २१ कि.मी. हाफ मॅरेथॉन , १० कि.मी. पॉवर रन, ५ किलोमीटर फन, तर ३ किलोमीटर फॅमिली रन होणार आहे. त्यातील विजेत्यांना पदक आणि सहा लाख रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.