शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बदलत्या काळानुसार गतिशील राहून उद्योजकता वाढवा : गिरीष चितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:38 IST

उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबदलत्या काळानुसार गतिशील राहून उद्योजकता वाढवा  : गिरीष चितळेसॅटर्डे क्लबतर्फे किरण पाटील उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : उद्योजकांनी बदलत्या काळाप्रमाणे गतिशील राहून आपली उद्योजकता वाढविली पाहिजे, तरच उत्पादकांची क्षमता वाढवून दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याचे समाधान मिळते, असे प्रतिपादन चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांनी येथे केले.येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे आयोजित ‘कोल्हापूर उद्योगरत्न’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष अशोक दुगाडे, महापौर शोभा बोंद्रे, मधुरिमाराजे, सॅटर्डे क्लबचे विश्वस्त प्रदीप ताम्हाणे प्रमुख उपस्थित होते.

घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे चेअरमन किरण पाटील यांना चितळे उद्योग समूहाचे संचालक गिरीष चितळे यांच्या हस्ते कोल्हापूर उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी गिरीष चितळे म्हणाले, कोल्हापूर ही उद्योगनगरी आहे. येथील उद्योजकता हे मोठे नेतृत्व आहे. हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे उद्योजकांनी बदल स्वीकारून आपला उद्योग वाढविण्यासाठी गतिमान राहणे आवश्यक आहे. किरण पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या मातीने मला भरूभरून दिले आहे. हा पुरस्कार मला पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.कार्यक्रमास महेश यादव, श्रीकृष्ण पाटील, योगेश कुलकर्णी, ओंकार देशपांडे, राजू पाटील, हरिश्चंद्र धोत्रे, सुधीर राऊत, नितीन वाडीकर, नवीन महाजन, एच. सी. मित्तल, सूरजितसिंग पवार, विजय पाटील, हर्षवर्धन भुरके, आदी मान्यवर उपस्थित होते. मनोज गुणे यांनी प्रास्ताविक केले. दिशा पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. जयेश पाटील यांनी आभार मानले.

नियमित विमानसेवेची प्रतीक्षाउद्योगाला पूरक असणाऱ्या विविध गोष्टी कोल्हापूरमध्ये आहेत. मात्र, येथे दळणवळणाचे प्रभावी साधन उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोल्हापुरात नियमित विमानसेवा कधी सुरू होते याची आम्ही उद्योजक प्रतीक्षा करीत आहोत, असे गिरीष चितळे यांनी सांगितले. ते म्हणाले, उद्योगात मराठी माणूस स्थिर होत आहे. स्वत:ची क्षमता सिद्ध करीत आहे.

 

 

टॅग्स :businessव्यवसायkolhapurकोल्हापूर