शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कोल्हापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांवर भर, ९८८ कोटींचे अंदाजपत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 15:46 IST

Kolhapur Municipal Corporation Budget :  आर्थिक परिस्थिती बेताची तसेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असताना सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०२२-२०२३ सालातील नवीन अंदाजपत्रकात जास्तीत जास्त चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली आहे.

कोल्हापूर : आर्थिक परिस्थिती बेताची तसेच उत्पन्नाचे मार्ग मर्यादित असताना सुध्दा कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन २०२२-२०२३ सालातील नवीन अंदाजपत्रकात जास्तीत जास्त चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच सध्या सुरु असणाऱ्या थेट पाईप लाईन योजना, अंबाबाई मंदिर परिसर विकास, पाणी पुरवठा वितरण योजना या महत्वाकांक्षी योजना नवीन वर्षात पूर्णत्वाला नेण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. 

कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक राजवट सुरु असून सलग दुसऱ्या वर्षी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महापालिकेचे नवीन वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासकिय उपसमितीसमोर सादर केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत याससंदर्भात सविस्तर माहिती दिली. 

सन २०२२ - २०२३ या अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षित जमा रुपये ६७३ कोटक्ष ७० लाख इतकी असून खर्च ६७२ कोटी ७१ लाख अपेक्षीत आहे. विशेष प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कामांसाठी अपेक्षीत जमा २४५ कोटी ४९ लाख रुपये असून खर्च २४१ कोटी ३० लाख अपेक्षीत आहे. महिला बालकल्याण निधी व केंद्रिय वित्त आयोग यांच्याकडून ६९ काेटी १२ लाख अपेक्षित असून खर्च ६८ कोटी ९२ लाख अपेक्षित आहे. एकूण महसुली, भांडवली व वित्त आयोग मिळून एकूण ९८८ कोटी ३१ लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्प 2022