शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ करा, शिवसेनेची मूक निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 19:26 IST

लोकराजा राजर्षी शाहंूच्या नगरीत राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे काम, राधानगरी येथील बंद पडलेले विद्युत केंद्र अशी अनेक कामे शासनाच्या लालफितीच्या काराभारामुळे व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अपूर्ण अवस्थेत आहेत. या रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून मूक निदर्शने केली.

ठळक मुद्दे रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ कराशिवसेनेची मूक निदर्शने

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहंूच्या नगरीत राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाचे काम, राधानगरी येथील बंद पडलेले विद्युत केंद्र अशी अनेक कामे शासनाच्या लालफितीच्या काराभारामुळे व लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे अपूर्ण अवस्थेत आहेत. या रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ व्हावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून मूक निदर्शने केली.राजर्षी शाहूंच्या नावे शासन योजना सुरू करते, परंतु अशा योजना पूर्णत्वाकडे जात नाहीत ही खेदाची बाब आहे. गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी सेवाभावी वृत्तीने शाहू महाराजांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सुरू केले. याच ठिकाणी असणाऱ्या श्री शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचा सुरू असलेला कारभार सर्वांना ज्ञात आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक संस्थांना केवळ शैक्षणिक उपयोगासाठी दिलेल्या मोफत जागांचा वापर काही संस्था व्यवसायासाठी करून त्यामधून नफा मिळवत आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी असणाऱ्या या मूळ उद्देशाचा विसर होत आहे. तरी सर्व रखडलेल्या कामांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी.या आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, राजेंद्र पाटील, शशी बिडकर, धनाजी यादव, संजय जाधव, अभिजित बुकशेठ, अरविंद यादव, प्रवीण पालव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.प्रमुख मागण्या...

  1. - छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळाचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करावे
  2. - राधानगरी धरणाजवळील बंद अवस्थेमधील विद्युत केंद्र सुरू करावे
  3. - शाहू मिल येथील गारमेंट पार्क सुरू करावे
  4. - शाहू महाराजांच्या समाधिस्थळाचे काम त्वरित करावे.

 

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना