शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, शाखा अभियंत्याचा उर्मटपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:54 IST

आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का’ अशा शब्दांत सुनावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला.

ठळक मुद्देकोल्हापूर : आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना , लोकशाही दिनात तक्रारदारऐकवला शाखा अभियंत्याचा उर्मटपणा

कोल्हापूर : आपल्या घरात पाणीपुरवठा होत नाही, अशी सातत्याने तक्रार करणाऱ्या एका नागरिकाने तुमच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देताच संबंधित महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्याने उलट तक्रारदारालाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरना, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का’ अशा शब्दांत सुनावल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. तक्रारदार पाटील यांनी अधिकाऱ्यांसमोरच हा घडलेला प्रकार ऐकवला तेव्हा खवळलेल्या आयुक्तांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना चांगलेच सुनावले. जर १८ नोव्हेंबरपर्यंत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर त्यानंतर रोज एक हजार रुपये दंड केला जाईल, असा सज्जड दम आयुक्तांनी दिला. अचानक समोर आलेल्या या प्रकाराने अधिकाऱ्यांची एकच भंबेरी उडाली.शनिवार पेठेत भाऊसिंगजी रस्त्यावर राहणाऱ्या मनोज रामचंद्र पाटील यांच्या घरात गेल्या दोन वर्षांपासून काही तांत्रिक कारणाने पाणीपुरवठा होत नव्हता. जेमतेम तासभर आणि तेही कमी दाबाने पाणी मिळत होते. त्यामुळे पाटील यांनी संबंधित शाखा अभियंता, अन्य कर्मचाऱ्यांच्याकडे तक्रार करत होते; परंतु त्यांच्या तक्रारीची कोणीच दखल घेत नव्हते.

एके दिवशी संतापाने त्यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्याचा इशारा त्या अधिकाऱ्यांना दिला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेण्याऐवजी उलट पाटील यांनाच ‘आयुक्तांना सांगा नाही तर कलेक्टरांना सांगा, ते काय पाणी सोडायला येणार आहेत का?’ अशा उर्मट भाषेत पाटील यांचा अवमान केला होता. काही दिवसांपूर्वीचा हा किस्सा आहे.पाटील सोमवारी लोकशाही दिनात आले होते. त्यांनी अधिकाऱ्यांच्यासमोर आयुक्त अभिजित चौधरी यांना हा प्रकार ऐकवला. अचानक चर्चा उपस्थित झाल्यामुळे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. आयुक्तांचाही रागाचा पार चढला. त्यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना धारेवर धरले. ‘तुमच्याबद्दलच्या असल्या तक्रारी ऐकायला मी येथे बसलो आहे का’ अशी विचारणा करत जर १८ नोव्हेंबरपर्यंत तक्रारीचे निरसन झाले नाही तर रोज एक हजार रुपये दंड केला जाईल, अशा शब्दांत दम भरला.महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा उर्मटपणा, त्यांच्या कामाची पद्धत, बेजबाबदारपणाचा एक अस्सल नमुना पाहायला मिळाल्याने आयुक्त चौधरी यांनी तीव्र शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. आपापल्या कार्यकक्षेतील कामे तातडीने पूर्ण करा, लोकशाही दिनापर्यंत तक्रारीही येता कामा नयेत, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांवर राग व्यक्त केला. सोमवारच्या लोकशाही दिनात एकूण १३ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर