शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : देवदासींचे प्रश्न हिवाळी अधिवेशनापूर्वी मागी न लागल्यास घेराओ : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 18:41 IST

देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी यांना महिन्याला ७००० रुपये पेन्शनसह विविध मागण्यांबाबत येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेतल्यास विधानभवनाला घेराओ घालू, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिला. देवदासी निराधार मुक्ती केंद्रातर्फे (गडहिंग्लज) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

ठळक मुद्देदेवदासींचे प्रश्न हिवाळी अधिवेशनापूर्वी मागी न लागल्यास घेराओ : श्रीपतराव शिंदेजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : मासिक ७००० पेन्शनसह विविध मागण्यांचा समावेश

कोल्हापूर : देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी यांना महिन्याला ७००० रुपये पेन्शनसह विविध मागण्यांबाबत येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेतल्यास विधानभवनाला घेराओ घालू, असा इशारा माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिला. देवदासी निराधार मुक्ती केंद्रातर्फे (गडहिंग्लज) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.देवदासी निराधार मुक्ती केंद्र (गडहिंग्लज)तर्फे देवदासी, जोगते, वाघ्या-मुरळी, शोषित महिला, बेघर, भूमिहीन यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरील धडक मोर्चासाठी देवदासी महिला, तृतीयपंथी गडहिंग्लजवरून बिंदू चौकात दाखल झाले.

या ठिकाणी माजी आमदार, श्रीपतराव शिंदे, प्रा. मेघा पानसरे, प्रा. विठ्ठल बन्ने यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. लक्ष्मीपुरी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. विविध मागण्यांचे फलक घेतलेल्या आंदोलक महिलांनी जोरदार घोषणा देऊन मोर्चा मार्ग दणाणून सोडला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माजी आमदार शिंदे यांच्यासह नेत्यांनी देवदासींचा प्रश्न सरकारने हिवाळी अधिवेशनापूर्वी मार्गी न लावल्यास विधानभवनाला घेराओ घालण्याचा इशारा दिला.यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना सादर करण्यात आले. शासनाने २००५ साली केलेल्या देवदासी निर्मूलन कायद्यामध्ये बदल केला पाहिजे, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नियंत्रण मंडळ स्थापन करून देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी व शोषित महिला यांच्या विविध योजना ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत राबविण्यात यावे.

देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी यांना महिन्याला ७००० रुपये पेन्शन मिळावी; त्यांना शासनाच्या विविध योजनांतर्गत मोफत घरे बांधून मिळावीत; देवदासींच्या मुला-मुलींच्या विवाहासाठी शासनाने ५० हजारांचा आहेर द्यावा; तसेच त्यांच्या मुलामुलींना शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये दोन टक्के आरक्षण द्यावे, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात डॉ. अच्युत माने, अशोक भंडारे, बापूसाहेब म्हेत्री, दत्तात्रय मगदूम, चंद्रकांत तेलवेकर, उज्ज्वला दळवी, पूनम म्हेत्रे यांच्यासह देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी, महिला सहभागी झाल्या होत्या.

देवदासी भाजपला मतदान करणार नाहीतदेवदासींचे प्रश्न या सरकारने लवकरात लवकर न सोडविल्यास येत्या निवडणुकीत देवदासी महिलांसह शोषित महिला या भाजपला मतदान करणार नाहीत, असा टोला श्रीपतराव शिंदे यांनी लगावला.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर