शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कोल्हापूर : प्रचाराचा फड शिगेला अन नेत्यांची धांदल

By admin | Updated: October 13, 2014 00:39 IST

सर्वत्र प्रचार रॅलींचा धुमधडाका : सभांवर जोर; कार्यकर्त्यांना उन्हाची पर्वा नाही

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता काही तासांचा अवधी शिल्लक असताना मतदानपूर्व रविवारची संधी साधून अनेक उमेदवार व त्यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, शिवसेनेच्या उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. एकंदरीत जिल्ह्यात प्रचार कमालीचा शिगेला पोहोचल्याचे सर्वत्र चित्र आहे. उद्या (सोमवारी) सायंकाळी प्रचाराचा तोफा थंडावल्या जाणार आहेत. ‘कोल्हापूर उत्तर’मधील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदारसंघातील प्रत्येक गल्ली अन् बोळ पिंजून काढून प्रचाराची राळ उडविली. फटाक्यांची आतषबाजी, हालगी, ताशांच्या कडकडाटात निघालेल्या पदयात्रांमुळे अवघे शहर ढवळून निघाले. निवडणुकीतील जाहीर प्रचाराची मुदत उद्या, सोमवारी सायंकाळी पाच वाजता संपत आहे. आज रविवार सुटी असल्याने सर्वच उमेदवारांनी मतदरांचे लक्ष वेधण्याकरीता प्रचारफेऱ्या काढल्या. त्यामुळे संपूर्ण शहर आज प्रचारफेऱ्यांमुळे दणाणून गेले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, शेकाप व मनसे अशा सहाही पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढल्यामुळे संपूर्ण शहरही रंगीबेरंगी झाले होते. मुक्त सैनिक वसाहतीत काँग्रेसची पदयात्रा कॉँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांनी आज मुक्त सैनिक वसाहत, कदमवाडी,भोसलेवाडी,जाधववाडी, कपूर वसाहत आदी परिसरात प्रचार पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. गळ्यात तिरंगी स्कार्प, हातात पक्षाचे झेंडे घेऊन वाद्यांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी सदर बाजार, विचारेमाळ व कपूर वसाहत हा परिसर सत्यजित कदम यांनी पिंजून काढलाशेकापची मोटारसायकल रॅलीशेकापचे उमेदवार मनिष महागांवकर यांनी आज मोटारसायकल रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सुमारे दोनशेहून अधिक मोटारसायकलस्वार सहभागी झाले होते.शहराच्या विविध भागांतून फिरून उभा मारुती चौकात विसर्जित झाली. उभा मारुती चौकात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग शिंदे होते.राष्ट्रवादीची सदर बाजारात पदयात्राराष्ट्रवादीचे उमेदवार आर. के. पोवार यांनी आज सकाळी दहा ते दीड यावेळेत सदर बाजार, विचारेमाळ, कपूर वसाहत पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. स्थानिक नगरसेवक राजू लाटकर, महेश जाधव, रेखा अनिल आवळे, आदिल फरास, रशीद बारगीर, प्रकाश गवंडी, प्रकाश पाटील, रमेश पोवार यांच्यासह तुकाराम तेरदाळकर, मंगल ठोकळे, मंगल चव्हाण, अर्जन सवयीसर्जी, सुदाम हुलस्वार आदी पदयात्रेत सहभागी झाले होते. सायंकाळी शिवाजी पेठेत राष्ट्रवादीची पदयात्रा सुरू झाली. या पदयात्रेत माजी महापौर सुनीता राऊत,अजित राऊत, परिक्षीत पन्हाळकर, उत्तम कोराणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. रात्री आर. के. पोवार यांच्या प्रचारार्थ तोरस्कर चौकात थ्रीडी सभा झाली. या सभेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांची भाषणे ऐकविण्यात आली. राजेश क्षीरसागर होम ग्राऊंडवरशिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी आज सकाळी शनिवार पेठ, बुधवार पेठ या आपल्या भागात काढलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने शिवसैनिक या पदयात्रेत सहभागी झाले होते. भगव्या टोप्या, भगवे ध्वज, स्कार्प घातलेल्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर भगवा करून टाकला. दाट लोकवस्ती असलेल्या या भागातील प्रत्येक गल्ली आणि बोळ क्षीरसागर यांनी पिंजून काढून मतदारांशी संवाद साधला. मतदारांनीही क्षीरसागर यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. सायंकाळी क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी महिलांनी मोठी प्रचारफेरी काढली. शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, वैशाली क्षीरसागर, शुभांगी साळोखे,पूजा भोर आदी महिला कार्यकर्त्यांनी या प्रचारफेरीचे नेतृत्व केले. खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी रान उठवले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांनी प्रचारसभा घेतल्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेऊन केंद्रातील मोदी सरकारवर टिकेची झोड उठवली. त्यांनी कोल्हापूर, जयसिंगपूर व गडहिंग्लज येथे सभा घेतल्या.खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही महायुतीच्या उमेदवारांसाठी रान उठवले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांनी प्रचारसभा घेतल्या.केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी निगवे दुमाला, पेठवडगाव व चंदगडच्या पाटणे फाटा येथे सभा घेतल्याशिवसेनेच्याप्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही शिवसेना उमेदवारांसाठी प्रचार रॅली व सभा घेतल्याचंदगड मतदारसंघातील जनता दलाच्या उमेदवार प्रा. स्वाती कोरी यांच्या प्रचाराथहलकर्णी फाटा येथे राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांची सभा.