शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसराची तासाला स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 13:39 IST

नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन हा परिसर अखंड २४ तास स्वच्छ राहावा या हेतूने महानगरपालिका आरोग्य विभागाने स्वच्छता तसेच कचरा उठावाचे काम तीन शिफ्टमध्ये करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता अधिकाऱ्यांसह ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे अंबाबाई मंदिर परिसराची तासाला स्वच्छतामहापालिकेची तयारी : नवरात्रीत तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त

कोल्हापूर : नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन हा परिसर अखंड २४ तास स्वच्छ राहावा या हेतूने महानगरपालिका आरोग्य विभागाने स्वच्छता तसेच कचरा उठावाचे काम तीन शिफ्टमध्ये करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरिता अधिकाऱ्यांसह ७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.येत्या बुधवारपासून (दि. १०) करवीस निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. या नऊ दिवसांत किमान १५ लाखांच्यावर भाविक मंदिराला भेट देत असतात. त्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील येणाऱ्या भाविकांची संख्यादेखील लक्षणीय असते; त्यामुळे मंदिर परिसरात निर्माल्य तसेच कचरा निर्माण होण्याचे प्रमाण मोठे असते. सध्या महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे दोन शिफ्टमध्ये परिसर स्वच्छता आणि कचरा उठावाचे काम आहे. नवरात्रीत ते २४ तास तीन शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे.एका शिफ्टमध्ये साधारण १५ कर्मचारी असतील. तीन शिफ्ट मिळून ४५ कर्मचारी रोज कचरा उठावाचे काम करतील. याशिवाय दैनंदिन कामकाजाप्रमाणे दोन वॉर्डचे मिळून ३० कर्मचारीदेखील सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामात सहकार्य देतील.

नवरात्रौत्सवात जोतिबा रोडवर शेकडो फुल विक्रेते, पूजेचे साहित्य विकणारे विक्रेते बसलेले असतात. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर राहिलेला माल रात्री रस्त्यावरच टाकून जातात; त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो. हा अनुभव लक्षात घेऊन तिसऱ्या शिफ्टसाठीही सफाई कर्मचारी नियुक्त केले आहेत.महापालिका व पोलीस विभागातर्फे ज्या ठिकाणी र्पाकिंगची सोय करण्यात येईल, त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे मोबाईल टॉयलेट व्हॅन उभ्या केल्या जाणार आहेत. या व्हॅनसह मंदिर परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे रोज दोनवेळा पाण्याने धुवून घेण्याच्या तसेच औषध फवारणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. भाविक सकाळी मंदिरात जात असताना महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता करत आहेत. तशाच घाणीतून मंदिरात जावे लागत आहे, हा प्रसंग यावर्षी टळणार आहे.याशिवाय महापालिकेचा एक अग्निशमन दलाचा बंब तसेच दोन रुग्णवाहिका मंदिर परिसरात सतत तैनात केले जातील. मंदिर परिसरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन जातात, त्या काल मंगळवारी स्वच्छ करून घेण्यात आल्या आहेत. तसेच त्यातील गाळ, कचरा काढण्यात आला आहे. उत्सवकाळात ड्रेनेजलाईन लिकेज होणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. 

 

टॅग्स :Ambadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर