शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : स्वामी विवेकानंद संस्थेच्या इमारतीस पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 16:43 IST

कोल्हापूर येथील मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद अश्रम व अद्यात्मिक केंद्राच्या सुशोभिकरणाच्या सुरु असलेल्या इमारत बांधकामास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन माहिती घेतली.

ठळक मुद्देस्वामी विवेकानंद संस्थेच्या इमारतीस पालकमंत्र्यांची सदिच्छा भेटबांधकामाचा घेतला आढावा : कामास निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन

कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद अश्रम व अद्यात्मिक केंद्राच्या सुशोभिकरणाच्या सुरु असलेल्या इमारत बांधकामास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन माहिती घेतली. इमारतीचे दुसऱ्या टप्प्यातील सुरु असलेले काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच इमारतीशेजारी असणाऱ्यां नवदुर्गातील द्वितीय अवतार श्री मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) देवीच्या मंदीराचाही लवकरच जिर्णोद्वार करावा अशीही अपेक्षा व्यक्त केली.श्री स्वामी विवेकानंद अश्रम व अद्यात्मिक केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च असणाऱ्या या इमारतीच्या पहिल्या मजल्याचे स्लॅबचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या मजल्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम स्थळी भेट दिली.केंद्राचे अध्यक्ष आनंदराव पायमल यांनी मंत्री पाटील यांना श्री स्वामी विवेकानंद यांच्या आत्मचरित्राची प्रत देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी बांधकामाचाबत अभियंता निकम आणि अभियंता व सुपरवायझर नरेंद्र पायमल यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.

इमारतीच्या कामाबाबत मंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त करत निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली. तसेच केंद्राचे हितचिंतक उद्योगपती चंद्रकांत जाधव हे बाहेर गावी असल्याने मंत्री पाटील यांनीही त्यांच्याशी मोबाईलवरुन चर्चा केली. यावेळी केंद्राचे उपाध्यक्ष सतिश पोवार, सचीव चंद्रकांत देसाई यांच्यासह सर्व विश्वस्त, संदीप चौगुले, अमर साळोखे, वैभव माने आदी भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री मुक्तांबिका मंदीराचाही जिर्णोद्वार करानवदुर्गातील द्वितीय अवतार श्री मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) देवीचे मंदीरही स्वामी विवेकानंद अश्रम व अध्यात्मिक केंद्राच्या आधिपत्याखाली असल्याने मुख्य इमारत बांधकामानंतर मंदीराचाही जिर्णोद्वार तातडीने करावा अशाही सुचना मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी विश्वस्थांना दिले.

 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम