शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींना मानधन अदा : चंद्रशेखर साखरे; धनादेशाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 14:15 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल आणि वयोवृद्ध खेळाडूंचे थकीत मानधन अदा करण्यास बुधवारपासून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी दिली.

ठळक मुद्दे हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरींना मानधन अदा : चंद्रशेखर साखरेधनादेशाचे वितरण

कोल्हापूर : जिल्ह्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल आणि वयोवृद्ध खेळाडूंचे थकीत मानधन अदा करण्यास बुधवारपासून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी दिली.हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी मल्लांचे मानधन रखडले असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये राज्यभर ५ डिसेंबरला प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी हे मानधन यापूर्वीच अदा केले असल्याचे सांगितले; मात्र, कोषागार कार्यालयातील तांत्रिक अडचणींमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी मल्ल आणि वयोवृद्ध खेळाडूंना मानधन मिळाले नव्हते. हे थकीत मानधन अदा करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. 

याबाबत जिल्हा क्रीडाधिकारी साखरे यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील १0 हिंदकेसरी, चार महाराष्ट्र केसरी आणि पाच वयोवृद्ध खेळाडूंच्या थकीत मानधनाची एकूण रक्कम ७ लाख ८ हजार रुपये कोषागार कार्यालयाकडून मंगळवारी क्रीडा कार्यालयाच्या खात्यावर जमा झाले; त्यामुळे संबंधित मल्ल, वयोवृद्ध खेळाडूंना त्यांच्या मानधनाच्या धनादेशांचे वितरण बुधवारपासून सुरू केले.

दिवसभरात दोन हिंदकेसरींना धनादेश देण्यात आले. उर्वरित हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, वयोवृद्ध खेळाडूंशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आहे. धनादेश नेण्यासाठी येताना संबंधित मल्ल, खेळाडूंनी त्यांच्या आधारकार्डची छायांकित प्रत घेऊन येणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीGovernmentसरकारkolhapurकोल्हापूर