शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : प्रिन्स शिवाजी हॉलच्या उभारणीसाठी हवाय मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 17:25 IST

कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि वाचनसंस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या करवीर नगर वाचन मंदिर या पुरातन वास्तूच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या उभारणीसाठी दानशूर कोल्हापूरकरांच्या मदतीचा हात हवा आहे.

ठळक मुद्देप्रिन्स शिवाजी हॉलच्या उभारणीसाठी हवाय मदतीचा हात‘कनवा’चे आवाहन :शुक्रवारपासून निधी संकलनास प्रारंभ

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि वाचनसंस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या करवीर नगर वाचन मंदिर या पुरातन वास्तूच्या प्रिन्स शिवाजी हॉलच्या उभारणीसाठी दानशूर कोल्हापूरकरांच्या मदतीचा हात हवा आहे.

सदर वास्तूसह सुसज्ज ग्रंथालय उभारणीसाठी सव्वाचार कोटी रुपये लागणार आहेत. वास्तू उभारणीचे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी कोल्हापूरकरांनी यथाशक्ती सहकार्य करावे, असे आवाहन संचालकांनी केले आहे. त्यासाठी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवारपासून निधी संकलन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.वाचनसंस्कृतीची मोठी परंपरा लाभलेल्या करवीर नगर वाचन मंदिराने यंदा १६८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेमध्ये सध्या दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखितांसह दीड लाख ग्रंथसंपदा, तर साडेतीन हजारांच्या वर सभासद आहेत.

देशातील सर्वांत जुन्या ग्रंथालयांमध्ये ‘कनवा’चा वरचा क्रमांक लागतो. संस्थेच्या विद्यमान संचालकांच्या वतीने अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना राबविल्या जात असून, गेल्या तीन वर्षांत जुन्या इमारतींचे नूतनीकरण, आधुनिक कपाटे, साखळी वाचनालय, अभ्यासिका असे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला प्रिन्स शिवाजी हॉल पूर्वी होता त्याच रूपात पुन्हा उभारण्यात येणार आहे. सध्या संस्थेचा स्वनिधी व दानशूरांच्या मदतीतून ६५ लाखांच्या रकमेत वास्तूच्या बांधकामाचे दोन स्लॅब तयार झाले आहेत. या वास्तूत पार्किंग, समोर प्रिन्स शिवाजी हॉल, मागील तीनमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर अभ्यासिका, आर्ट गॅलरी, दुसऱ्या मजल्यावर रेडिओ स्टेशन, कॉन्फरन्स हॉल, अभ्यासिका अशी विविध दालने असणार आहेत.

या पूर्ण प्रकल्पासाठी सव्वाचार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा निधी जमा करण्यासाठी संचालक मंडळाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी उद्योगपती, डॉक्टर, इंजिनिअर अशा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसह निधी देणाºया सामाजिक संस्था तसेच शासनाकडेही प्रस्ताव पाठविला आहे.कोल्हापुरातील सर्वसामान्यांपासून ते ग्रंथांसाठी, वाचन चळवळीसाठी झटणाऱ्या व्यक्तींचा सहभाग यात असावा, यासाठी संस्थेच्या वतीने निधी संकलन उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला जमतील तितक्या रकमेची मदत दानपेटीत टाकू शकते. तरी दानशूर कोल्हापूरकरांनी निधीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

कोल्हापूरच्या लौकिकात मानाचा तुरा ठरेल अशा प्रिन्स शिवाजी हॉलची उभारणी हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी फार मोठा निधी लागणार आहे. या निधी संकलनासाठी आमचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. दानशूर कोल्हापूरकरांचे सहकार्य मिळाले तर लवकरात लवकर आम्ही वास्तू उभारू शकू.- सतीश कुलकर्णी (कार्यवाह) 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर