शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
2
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
3
४४६ मंदिरे, ११०० घरे, २३०० दुकाने पाडणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोण ? माजी आमदार अनिल गोटेंचा सवाल
4
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
5
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या घसरण, चांदीही उच्चांकी स्तरापासून स्वस्त झाली; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
6
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
7
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
8
गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव
9
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
10
ना निधी, ना उपकरणं... स्वप्न केलं साकार; भारतीय महिला आइस हॉकी संघाने रचला इतिहास
11
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
12
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
14
ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...
15
Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
16
राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?
17
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
18
स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!
19
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?
20
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान

कोल्हापूर : आरोग्यदेवता धन्वंतरीच्या पूजनाने ‘धनत्रयोदशी’ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 16:19 IST

आरोग्यदेवता धन्वंतरीच्या पूजनाने सोमवारी ‘धनत्रयोदशी’ उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील रुग्णालये, दवाखाने, तसेच औषधांच्या दुकानात सायंकाळी हे पूजन झाले. या दिवशी व्यापारी वार्षिक ताळेबंदाची वही खरेदी करतात.

ठळक मुद्देआरोग्यदेवता धन्वंतरीच्या पूजनाने ‘धनत्रयोदशी’ उत्साहात देवतेचे विधीवत पूजन, दारादारांत प्रकाशोत्सव

कोल्हापूर : आरोग्यदेवता धन्वंतरीच्या पूजनाने सोमवारी ‘धनत्रयोदशी’ उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील रुग्णालये, दवाखाने, तसेच औषधांच्या दुकानात हे पूजन झाले. या दिवशी व्यापारी वार्षिक ताळेबंदाची वही खरेदी करतात.वसूबारसने दिवाळीचे पडघम वाजल्यानंतर सोमवारी धनत्रयोदशी उत्साहात साजरी झाली. आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचा जन्मदिवस. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, व्यावसायिकांकडून धन्वंतरीचे पूजन केले जाते. यानिमित्त सरकारी-खासगी रुग्णालये, दवाखाने तसेच औषधांच्या दुकानांना फुलांनी सजवण्यात आले होते. सायंकाळी देवतेचे विधीवत पूजन करण्यात आले.

कोल्हापुरात अंबाबाई मंदिराच्या परिसरात धन्वंतरी देवतेचे मंदिर आहे. येथे सोमवारी सकाळी अभिषेक व पूजाविधी संपन्न झाले. दिवसभर नागरिकांनी देवतेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.या शिवाय ‘धनतेरस’ या नावानेही प्रसिद्ध असलेल्या या दिवशी श्री लक्ष्मीची आराधना केली जाते. धन, सुख-समृद्धीची ही देवता असल्याने अनेक कुटुंबांमध्ये धने व श्री लक्ष्मीची मूर्ती ठेवून देवीची पूजा केली जाते. व्यापारी, व्यावसायिक रोजमेळे, ताळेबंदाच्या नवीन वह्या खरेदी करतात.

याच दिवशी यमदीपदानही होते आणि दीपावलीचे दिवे लावण्यास सुरुवात होते. या दिवशी दक्षिणेकडे पणती लावली की घरात कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही अशी श्रद्धा आहे. यालाच ‘यमदीपदान’ असे म्हणतात. त्यामुळे दारादारांत आता मिणमिणत्यांचा प्रकाशोत्सव सुरू झाला आहे. 

 

टॅग्स :Diwaliदिवाळीkolhapurकोल्हापूर