शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :भुयेतील अपंग बहिणींसाठी मदत सुरू, व्हीलचेअर, वॉकर, भांडी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:52 IST

भुये (ता. करवीर) येथील पुतळा आणि वैजयंती कांबळे या दोघा अपंग बहिणींसाठी समाजातून मदतीचे हात अजूनही पुढे येत आहेत. रविवारी ‘गरजूंना मदत करूया’ (गमक) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बहिणींची भेट घेऊन, त्यांना एक व्हीलचेअर, वॉकर, घरगुती भांडी, साडी-चोळी व शाल भेट देऊन त्यांच्या दु:ख हलके केले.

ठळक मुद्देभुयेतील अपंग बहिणींसाठी मदत सुरूव्हीलचेअर, वॉकर, भांडी भेट

कोल्हापूर : भुये (ता. करवीर) येथील पुतळा आणि वैजयंती कांबळे या दोघा अपंग बहिणींसाठी समाजातून मदतीचे हात अजूनही पुढे येत आहेत. रविवारी ‘गरजूंना मदत करूया’ (गमक) या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बहिणींची भेट घेऊन, त्यांना एक व्हीलचेअर, वॉकर, घरगुती भांडी, साडी-चोळी व शाल भेट देऊन त्यांच्या दु:ख हलके केले.‘लोकमत’मध्ये ‘भुयेतील अपंग बहिणींबाबत नियती निष्ठुर’ या मथळ्याखाली जगण्याचा संघर्ष करणाऱ्या पुतळा व वैजयंती कांबळे या दोघा अपंग बहिणींचे वास्तव मांडले होते. या वृत्ताची दखल घेऊन समाजातील दानशूर व्यक्ती पुढाकार घेऊन या बहिणींचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.रविवारी सायंकाळी गडहिंग्लज येथील ‘गमक’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांबळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. घरगुती उपयोगासाठी त्यांना भांडी, साडी-चोळी व शाल या बहिणींनी दिली.

तसेच रोटरी क्लब आॅफ मुंबई, गोरेगाव-वेस्ट येथील बाबू गिरप व पुष्कराज कोल्हे यांच्या वतीने व्हीलचेअर व वॉकर भेट म्हणून दिला. याप्रसंगी पुणे येथील संदीप पाटील, अवधूत पटेकर, सचिन जाधव, धीरज साळोखे, सदानंद पाटील, संतोष कोरे, विकास गायकवाड, आदी उपस्थित होते.

या दोघी बहिणींचे दु:ख हलके करण्यासाठी आम्ही मदत केली आहे. गोरेगाव येथील ‘रोटरी’च्या वतीने व्हीलचेअर व वॉकर भेट दिला आहे. यासह आमच्या संस्थेच्या वतीने या दोघींना शासकीय योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.बाळासाहेब पाटील,राज्य सचिव,राष्ट्रीय अपंग विकास महामंडळ

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर