शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

कोल्हापुरात-हातकणंगलेत इर्षेने मतदान, रांगा लावून बजावला हक्क : मतदान यंत्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 7:36 PM

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात मंगळवारी सर्वत्रच अत्यंत इर्षेने व ग्रामपंचायत निवडणूकीप्रमाणे रांगा लावून मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये ६५.७५ तर हातकणंगलेमध्ये ६४ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणूकीत कोल्हापूरमध्ये ७२ तर हातकणंगलेत ७३ टक्के मतदान झाले होते. या दोन मतदार संघातील मतदानाची टक्केवारी राज्यातच काय देशात सर्वाधिक आहे. आता लोकांच्या नजरा २३ मे रोजी होणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात-हातकणंगलेत इर्षेने मतदानरांगा लावून बजावला हक्क : मतदान यंत्रे बंद

कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात मंगळवारी सर्वत्रच अत्यंत इर्षेने व ग्रामपंचायत निवडणूकीप्रमाणे रांगा लावून मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये ६५.७५ तर हातकणंगलेमध्ये ६४ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणूकीत कोल्हापूरमध्ये ७२ तर हातकणंगलेत ७३ टक्के मतदान झाले होते. या दोन मतदार संघातील मतदानाची टक्केवारी राज्यातच काय देशात सर्वाधिक आहे. आता लोकांच्या नजरा २३ मे रोजी होणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.कोल्हापूरात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक विरुध्द शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात तर हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी विरुध्द शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. दोन्ही मतदार संघात ७२ ठिकाणी एव्हीएम यंत्रे बंद पडल्याने मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली. तिथे लगेच नवीन यंत्र किंवा आहे तेच दुरुस्त करून मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. २९ गावांतील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

मुरगुडमध्ये दोन मतदान केंद्रावर मशीन बंद होते, त्यामुळे मतदान तब्बल एक तास उशिरा सुरु झाले, यामुळे केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. कसबा सांगाव येथे मतदान केंद्र क्र.४० वर सकाळी ७ वाजताच सुमारे अर्धा तास मशिन बंद पडले. माणगाव येथे तब्बल अधार्तासाने मशिन सुरू झाले. मतदान स्लिप मध्ये गोंधळ होता. नाव एकाचे फोटो एकाचा अशी स्थिती होती. शिरोळ तालुक्यातही अनेक केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.

सेनापती कापशी, ता.कागल येथील मतदान केंद्र क्रमांक २२८ वर मतदान यंत्र बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली. चुये ता. करवीर येथे सकाळी अर्धा तास मतदानयंत्र बंद झाल्यामुळे मतदानासाठी रांगा वाढल्या. कणेरी येथे २७१ केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला. देवाळे, ता. करवीर येथील ३0 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब, झाल्याने गोंधळ उडाला. येथील ३२७ मतदान केंद्रावरील यंत्र बंद पडल्याने एक तास मतदारांना ताटकळत बसावे लागले, पेठवडगाव येथे शारदा विद्या मंदीरमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाला. गाडेगोंडवाडी, बाचणी ता. करवीर येथील मतदार यंत्रात बिघाड झाल्यानेही एक तास मतदान बंद होते. वेळ वाढवून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली परंतु वेळ वाढवून न देण्याचा निर्णय निवडणुक निर्णय अधिकारी यांनी दिला. गाडेगोंडवाडी ता. करवीर येथील ४० मतदारांची नावे मतदार यादीतून गायब होती. शिरोळमध्ये तांत्रिक बिघाडामुळे ३८ ठिकाणी ईव्हीएम मशिन बदलण्यात आले, तर इचलकरंजीत ४ यंत्रे बदलण्यात आली.कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील दिंडनेर्ली, इस्पुर्ली, नंदगाव, नागाव या मतदान केंद्रावर आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली. एकोंडी, बामणी ता. कागल येथे शेतीच्या कामाची लगबग असल्याने शेतकऱ्यांनी लवकर मतदान करणे पसंत केले. कागल तालुक्यात ग्रामीण भागात तीन गट एकीकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे अशी लढत असल्याने मतदानाला चुरस दिसून आली नाही.‘धामणी’ खोºयातील २५ गावांचा मतदानावर बहिष्कारम्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील गेले १८ वर्र्षे रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पासाठी ‘धामणी’ खोºयातील २५ गावांना लोकसभा मतदानांवर बहिष्कार टाकला. पाणीदार गावांचा अपवाद वगळता उर्वरित गावांनी बहिष्कारास शंभर टक्के पाठींबा दिला. ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवत दैनंदिन कामात व्यस्त राहणेच पसंत केले. एकाच प्रश्नांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने सामुदायिकपणे मतदानावर बहिष्कार घालण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे या गावातील सुमारे ११ हजार मतदान यामुळे होऊ शकले नाही. दुपारी १२ पर्यन्त सोळांकूर येते मतदान केंद्र क्रमांक १३0 वर एकही मतदार आला नव्हता, वेतवडे, ता पन्हाळा येथील मतदान केंद्रावरही शुकशुकाट होता. पासार्डे पैकी पाचाकटेवाड़ी येथील ग्रामस्थांनी रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे तेथेही मतदान झाले नाही. करवीर पश्चिम भागात उन्हामुळे मतदान केंद्रावर गर्दी कमी होती.मुश्रीफांची खडाजंगी, जवाहरनगरमध्ये पैसे जप्तकसबा सांगाव येथे आमदार मुश्रीफ आणि पोलिस उपाधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यात कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यावरुन खडाजंगी झाली. जवाहरनगर भागात पैसे वाटप, अरूण सोनवणे यांच्या घरातून दिड लाख जप्त करुन पोलिसांनी कारवाई केली. सिद्धानेर्ली ता.कागल येथे धनंजय महाडिक यांनी भेट देऊन युवकांबरोबर सेल्फीही काढली. तर इचलकरंजीत मर्दा कुटूंबातील सदस्यांनी एकाच वेळी मतदान केले. रूकडी येथे प्रथमच सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले होते. रत्नागिरीच्या जिल्हा न्यायाधीश शबनम अन्सार विराणी यांनी यड्राव येथील पार्वती विद्या मंदिर येथे मतदान केले, तर पन्हाळा येथे खास रायगडहून आलेले स्वदेश फौंडेशनचे समन्वयक तुषार इनामदार यांनी मतदान केले. उपनगरातही लगतच्या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात मोठ्या चुरशीने मतदान झाले. पााचगाव, गोकूळ शिरगाव, तपोवन, कळंबा येथे मतदारांनी रांगा लावून मतदान केले.

या नेत्यांनी केले मतदानपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तपोवन येथे पत्नी अंजली, आई आणि सासूसह मतदान केले. कॉग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष पी. एन. पाटील सडोलीकर यांनी सडोली (खालसा) ता.करवीर येथे, हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने, वेदातिका माने, माजी खासदार निवेदिता माने, सत्त्वशील माने यांनी रूकडी येथे मतदान केले. आमदार अमल महाडीक आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शिरोलीत मतदान केले. माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील, प्रतिमा सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथील राजश्री शाहू विद्यालय शाळा नंबर ११ येथे रांगेत उभे राहून मतदान केले. लिंगनुर दुमाला ( ता.कागल) येथे आमदार हसन मुश्रीफ चिमगाव येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रा . संजय मंडलिक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. शिंदेवाडीत म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी तर शिवाजी पेठेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला.सोळांकूर येथे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजीत मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि कुटूंबियांनी इचलकरंजीत मतदान केले. इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी सह कुटुंब मतदान केले. मिणचे येथे आमदार सुजित मिणचेकर यांनी पत्नी, मुलासह मतदानाचा हक्क बजावला. हातकणंगले मतदारसंघाचे स्वाभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी शिरोळच्या जनता हायस्कूल या केंद्रावर मतदान केले. माजी मंत्री डॉ.विनय कोरे , वारणा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे, वारणा बॅकेचे चेअरमन निपुण कोरे  स्नेहा कोरे, शुभलक्ष्मी कोरे, विश्वेश कोरे यांनी पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील वारणा विद्यामंदीर केंद्र २२३ क्रमांक मध्ये मतदानाचा हक्क बजावला.

वृध्द मतदारांनी केले हिरीरीने मतदानअनेक ठिकाणी दिव्यांग, वृध्द तसेच महिलांसाठी मतदानाची चांगली सोय करण्यात आली होती.  व्हनूर, ता कागल येथील वयोवृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचवले जात होते. मोरेवाडी ता भुदरगड येथील वृद्ध दाम्पत्य धोंडीराम नलवडे (वय ९६) आणि कोंडुबाई नलवडे (वय ९०) यांनी मताचा अधिकार बजावला. मांगले ता. शिराळा येथील कासुबाई धोंडीराम गराडे-पाटील (वय १०१) यांनी मतदानाचा हक्क बजावला तर राशिवडे येथील परशुराम विद्यालय येथे ताराबाई रघुनाथ पाटील या शंभरी पार केलेल्या महिलेने मतदान केले. कळंबा माळवाडी येथील मतदान केंद्रावर १०५ वर्षांच्या इंदूबाई पांडुरंग साळोखे (साळोखे गल्ली) यांनी मतदानाचा हक्क बजावला तर कसबा बीड ता. करवीर येथे मारूती बळवंत देसाई ( वय ९८ ) यांनी मतदानाचा हक्क बजावला. गलगले (ता. कागल) या गावातील सर्वात ज्येष्ठ धोंडूबाई जोती मगदूम (वय १०५) यांनी मतदान केले. कोथळी येथील वालुबाई विठू पाटील या १0७ वर्षांच्या वृध्देने मतदान केले. पहिली लोकसभा ते आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीसाठी त्यांनी मतदान केले आहे. कागल येथेही ऐंशी वर्षे वयाच्या आजारी वृद्धाने मतदान केले.दिव्यांगानीही केले मतदानबांबवडे येथील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सहायक अभियंता दिव्यांग ज्ञानेश्वर कांबळे यांनी मतदानाचा हक्क बजविला . निवृत्त सैन्य अधिकारी अनंत कुलकर्णी (वय 90 ) यांनी कोगे ता. करवीर येथे मतदान केले. त्यांचे दोन्ही पाय नाहीत. रुकडी येथील दिव्यांग अशोक दादू कुरणे यांनी तळपत्या उन्हात मतदानाचा हक्क बजावले. सुर्वे नगरच्या प्रभाग ७९ येथील महावीर इंग्लिश मिडीयम स्कुल मधील केंद्रावर नवनाथ कोळी या अपंग मतदाराने व्हील चेअरवरून येउन मतदानाचा हक्क बजावला तर गोकूळ शिरगाव येथे ६९ वर्षीय दिव्यांग बाळासो शंकर पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. कोडोली येथील हावर्ड हायस्कूल येथे दोन्ही पायाने अपंग असणारे भूपाल यादव महापूरे यांनी मतदान केले.

सखी मतदान केंद्र

कागल येथे जयसिंगराव पार्कात सखी   मतदान केन्द्रावर मतदारांचे स्वागत करतांना तहसीलदार गणेश गोरे, मुख्याधिकारी टीना गवळी व महीला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील ओकोली येथे सखी मतदान केंद्र उभारले होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर