शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोल्हापुरात तीन महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 14:32 IST

CoronaVirus Kolhapur- गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या कोल्हापुरात गुरुवारी नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ६२ रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील २७, तर अन्य जिल्ह्यांतील १६ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात तीन महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्ण नव्या ६२ रुग्णांची भर, धोका वाढला, दोन महिलांचा मृत्यू

कोल्हापूर : गेल्या तीन महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या कोल्हापुरात गुरुवारी नोंदविण्यात आली. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ६२ रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील २७, तर अन्य जिल्ह्यांतील १६ रुग्णांचा समावेश आहे.कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर दक्षता घ्यावी लागणार आहे. कणकवली तालुक्यातील ७८ वर्षांच्या महिलेचा, तर कागल तालुक्यातील व्हनाळी येथील ६७ वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

डिसेंबर २०२०पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. त्यानंतरच्या तीन महिन्यांत ती ५ पासून २५ पर्यंत अशी येत होती. मात्र गेल्या चार दिवसांत टप्प्याटप्याने ही संख्या वाढू लागली आहे.

गुरुवारी, तर ६२ रुग्ण नोंदविण्यात आल्याने वैद्यकीय अधिकारीही काळजीत पडले आहेत. एकीकडे दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असतानाच जिल्ह्यात तीन महिन्यांनंतर ५० हून अधिक पाच रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.भुदरगड तालुक्यात एक, करवीर तालुक्यात ११, पन्हाळा तालुक्यात एक, शाहूवाडी तालुक्यात एक, नगरपालिका क्षेत्रात पाच रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरामध्ये ३७६ जणांची तपासणी करण्यात आली असून, १,३५४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १४३ जणांची ॲन्टिजेन टेस्ट घेण्यात आली असून, ३७४ जणांवर उपचार सुरू आहेत.

  • आतापर्यंतचे कोरोनाचे एकूण रुग्ण ५१ हजार ०६३
  • डिस्चार्ज झालेले रुग्ण ४८ हजार ९३५
  • आतापर्यंतचे मृत्यू १७५४
  • सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ३७४
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर