शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

कोल्हापूरचे पालकमंत्री बदलणार?, केसरकरांनीच दिली स्पष्ट कबुली; मुश्रीफांचे नाव आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 11:46 IST

शेवटचा दौरा असल्याची चर्चा

कोल्हापूर : पुढच्या कार्यक्रमावेळी मीच पालकमंत्री असेन किंवा शिक्षणमंत्री असेन का हे माहिती नाही अशी स्पष्ट कबुली पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आणि पालकमंत्री बदलाच्या चर्चेला शुक्रवारी दुपारपासून पुन्हा सुरुवात झाली. केसरकर यांनी शुक्रवार, शनिवारी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तब्बल १७ कार्यक्रम घेतल्याने त्यांचा या पदावरचा शेवटचा दौरा असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात केसरकर यांनी वरील उद्गार काढले. जरी मी पुढच्या वेळेपर्यंत पालकमंत्री, शिक्षणमंत्री नसलो तरी जिल्हा परिषदवाल्यांना मी जेवण देणार आहे असेही त्यांनी सांगितले. यानंतर कोल्हापूरच्या प्रलंबित पालकमंत्रिपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.त्याला कारणही तसेच घडले आहे. केसरकर यांनी या दोन दिवसांच्या दौऱ्यात भरगच्च असे कार्यक्रम घेतले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांचे शुक्रवारी भूमिपूजन केले. लोकार्पण सोहळाही केला. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेत बैठक घेतली. अंबाबाई, जोतिबा विकासकामांचा आढावा घेतला. यानंतर वडगाव, हातकणंगले, हुपरी नगर परिषदांमध्ये आढावा बैठका ठेवल्या.आज शनिवारच्या दौऱ्यात त्यांनी सकाळी लवकर भाजपच्या शिष्टमंडळाला वेळ दिली आहे. त्यानंतर कुंथुगिरी, कुंभोज, जयसिंगपूर, शिरोळ नगरपालिकांची आढावा बैठक ठेवली आहे. नृसिंहवाडीला दत्त दर्शन घेऊन ते कुरुंदवाड नगरपालिकेत जाणार आहेत. दुपारनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमवेत कागल नगर परिषदेत आढावा बैठक घेणार आहेत. एकूण दौरा पाहता महायुतीतील तीनही पक्षांना त्यांनी न्याय देताना सर्वांनाच वेळ दिला आहे. त्यामुळेच त्यांचा हा पालकमंत्री म्हणून शेवटचा दौरा आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

हसन मुश्रीफ आघाडीवरकोल्हापूरच्य पालकमंत्रिपदासाठी हसन मुश्रीफ यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद वरिष्ठ पातळीवर गेल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने पुण्याचे पालकमंत्रिपद भाजपकडेच राहील असे स्पष्ट केल्याचे समजते. त्यामुळे हसन मुश्रीफ यांचा कोल्हापूरला मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते. परंतु सध्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता कधीही काहीही होवू शकते यानुसार मुश्रीफ यांची स्वप्नपूर्ती होते की आणखी काही धक्कादायक निर्णय होतो हे लवकरच कळणार आहे.

शासकीय विश्रामगृहावरही अधिकाऱ्यांची लगबगकेसरकर यांच्या या दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांची सुरू असलेली लगबग नेहमीची नसल्याचे सांगण्यात येते. जिल्हा नियोजन समितीकडील काही तटलेली कामे मार्गी लावण्यासाठीही या दौऱ्यात खास वेळ ठेवण्यात आला असून, तशा हालचाली शासकीय विश्रामगृहावर दिसून येत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीDeepak Kesarkarदीपक केसरकर Hasan Mushrifहसन मुश्रीफ