शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चिमुकल्यांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटीलअंबाबाई चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 15:43 IST

आर्थिक परिस्थितीमुळे हृदयरोगाशी संबंधित कठीण शस्त्रक्रिया करणे अशक्य असणाऱ्या मुलांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. या चिमुकल्यांना घेऊन पालकमंत्र्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

ठळक मुद्दे चिमुकल्यांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील अंबाबाई चरणीअंबाबाई चरणी ओटी अर्पण

कोल्हापूर : आर्थिक परिस्थितीमुळे हृदयरोगाशी संबंधित कठीण शस्त्रक्रिया करणे अशक्य असणाऱ्या मुलांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. या चिमुकल्यांना घेऊन पालकमंत्र्यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासह बालक व पालकांनी अंबाबाई चरणी ओटी अर्पण केली.काही महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोगाशी संबंधित ० ते १८ वयोगटांतील मुलांचे २-डी ईको व हृदयरोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. शिबिरामध्ये २८८ बालकांचे २-डी ईको करण्यात आले होते. यामधील सदोष ५८ पैकी २६ बालकांवर मुंबई व कोल्हापूर येथे पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.गरजू रुग्णांना तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी कावळा नाका विश्रामगृह येथे स्वतंत्ररित्या पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यरत आहे. हा कक्ष गरजूंना सर्वतोपरी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कार्यरत असल्याने या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.यावेळी ‘पणन’चे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, संदीप देसाई, आरोग्य समन्वयक अनिकेत मोरबाळे, धनाजी जाधव आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलAmbadevi Mandirअंबादेवी संस्थानkolhapurकोल्हापूर