शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : गवार, वांगी, स्वस्त; कांदा वाढला, तांदळाच्या दरात किचिंत वाढ, द्राक्षे, अननस, माल्टाला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:31 IST

नेहमी जेवणात वापरणारा कांद्याचा दर या आठवड्यात प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढला आहे. तो २८ रुपयांच्या घरात गेला आहे. दुसरीकडे, गवार आणि वांगी, काद्यांची पात आवक जास्त आल्याने दरात घसरण झाली आहे; पण, इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. भाज्याबरोबर कडधान्यालाही ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

ठळक मुद्देगवार, वांगी, स्वस्त; कांदा वाढलातांदळाच्या दरात किचिंत वाढ द्राक्षे, अननस, माल्टाला मागणी

कोल्हापूर : नेहमी जेवणात वापरणारा कांद्याचा दर या आठवड्यात प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढला आहे. तो २८ रुपयांच्या घरात गेला आहे. दुसरीकडे, गवार आणि वांगी, काद्यांची पात आवक जास्त आल्याने दरात घसरण झाली आहे; पण, इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. भाज्याबरोबर कडधान्यालाही ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.रविवारचा आठवडी बाजार लक्ष्मीपुरी तर कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, गंगावेस उद्यानजवळ दैनंदिन बाजार भरतो. गेल्या आठवड्यातील मकर संक्रांत सणामुळे या आठवड्यात ग्राहकांची रेलचेल बाजारात कमी दिसून येत होती; पण; माल्टा, अननस, द्राक्षे (पिवळी व काळी) यांना ग्राहकांकडून मागणी जास्त होती.

माल्टाचा दर प्रतिकिलो ५० रुपये, राणी अननस ४० रुपये तर राजा अननस ३० रुपये असा होता. द्राक्षांचा दर ८० ते शंभर रुपयांच्या घरात होता. कोबी, टोमॅटो (लाल), ढब्बू मिरची, घेवडा, कारली, भेंडी, वरणा, फ्लॉवर, दोडक्याचे दर स्थिर होते. मात्र, गवार व वांग्याची आवक जास्त आल्याने घसरण झाली होती.

गेल्या आठवड्यात गवारचा प्रतिकिलो दर ४० रुपयांवरून तो २६ रुपयांच्या घरात आला आहे. वांगी २० रुपयांवरून ती १५ रुपये होती. कांद्यांची पात दोन रुपयांनी कमी झाली. पेंढीचा दर पाच रुपये असा होता. मेथीच्या पेंढीत एक रुपयांनी वाढ होऊन ती पाच रुपये झाली.काकडी , वाल, बिनीस, दुधी भोपळा, गाजर, आल्हेचा, पालक, पोकळा, बटाटा, लसणाचा व सफरचंद, स्ट्रॉबेरी आणि ड्रायफ्रुट दर स्थिर होता. बटाटा नऊ रुपये तर लसूण २५ रुपये प्रतिकिलो दर होता. त्याचबरोबर सर्वप्रकारच्या तांदूळ दरात चार ते पाच रुपये वाढ झाली आहे. ४० रुपये प्रतिकिलोचा दर तो ४४ रुपये झाला आहे.

फळ मार्केटवर नजर...

  1.  डाळींब - एक किलो ४० रुपये
  2.  सीताफळ - ढीग ७५ रुपये
  3. बोरे -११ रुपये किलो
  4.  चिक्कू -शेकडा ३७५ रुपये 

असा आहे दर...

  1. शेंगतेल १००
  2. मूग, मसूर, शेंगदाणा ८०
  3. सरकी तेल ७६ ते ७८ रुपये
  4. शाबू, तूरडाळ ७५ 
  5. हिरवा वटाणा ४० ते ६० रुपये
  6.  गूळ ४० रुपये

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarketबाजार