शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कोल्हापूर : ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 17:15 IST

: ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी १८ सप्टेंबर रोजी येथील निर्धार संस्था आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्दे‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांना अभिवादन‘प्रायव्हेट’मध्ये विद्यार्थ्यांनी ऐकली ‘मृत्युंजय’कारांची मुलाखत

कोल्हापूर : ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी १८ सप्टेंबर रोजी येथील निर्धार संस्था आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, तसेच ‘अक्षर दालन’चे रवींद्र जोशी यांच्या हस्ते ‘मृत्युंजय’कारांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मेन राजाराम हायस्कूलमध्ये अध्यापन करीत असतानाच सावंत यांनी ‘मृत्युंजय’चे लिखाण सुरू केले. त्यामुळे एका अर्थाने जिल्हा परिषद आणि शिवाजीराव सावंत यांचा वेगळा ऋणानुबंध आहे. त्यामुळेच मेन राजाराम हायस्कूलमध्ये प्रतिवर्षी स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित केला जावा, अशी अपेक्षा यावेळी समीर देशपांडे यांनी व्यक्त केली. यावेळी नारायण बेहेरे, नम्रता बेहेरे, अथर्व देशपांडे, वर्षा चराटे, कोमल पाटील, चंद्रकांत सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

‘प्रायव्हेट’मध्ये विद्यार्थ्यांनी ऐकली ‘मृत्युंजय’कारांची मुलाखतप्रायव्हेट हायस्कूलमध्ये ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांचा स्मृतिदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. समीक्षक वैजनाथ महाजन यांनी ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांची आकाशवाणीसाठी घेतलेली मुलाखत नववी ‘अ’ च्या विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आली. संजीवनी देशपांडे यांनी यावेळी शिवाजीराव सावंत यांच्याविषयी माहिती सांगितली. कोल्हापुरातील दसरा चौकातील पोलीस कॉलनीमध्येच या कादंबरीचा जन्म झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूरzp schoolजिल्हा परिषद शाळा